कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:24+5:302021-03-21T04:10:24+5:30

कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा असणाऱ्या या तालुक्यात ...

Farmers worried over declining market prices of onions | कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Next

कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा असणाऱ्या या तालुक्यात मोठया प्रमाणात कांद्यांचे उत्पादन घेतले जाते परंतु याच कांंदा पिकाला सध्या बाजार भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.

जुन्नर बाजारसमिती अंतर्गत आळेफाटा ओतुर येथील उपबाजारात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. काही दिवसापुर्वी या चांगल्या कांद्याला ३५ ते 50 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता परंतु आता त्याच कांद्याला 8 ते 14 रूपये किलो दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाल्याचे दिसत आहे .

मागणीमुळे अनेक दिवस कांद्याचे दर टिकून होते. त्याचा परिणाम आवक वाढण्यावर झाला आहे. शेतकरी काढणीयोग्य झालेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणत होते , परिणामी बाजारात कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. या आठवडयात कांद्याचे बाजार भाव वाढतील का असे ? चिन्ह शेतकऱ्यांमध्ये सध्या दिसत आहेत, सध्या कांदा काढनीला वेग आला असला तरी बजारभावा अभावी शेतकरी चिंताग्रस्त आहे, शेतकऱ्यांना मिळत असलेल्या सध्याच्या बाजारात कांदा विकुन होणार खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे तरी पैसे होतील अशी आशा होती परंतु सध्याचे बाजारभाव खूपच खाली आल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

कांदा काढणी वेगात सुरु परंतु बाजारभाव नसल्याने शेतकरी कांदयाची आरण लावताना

Web Title: Farmers worried over declining market prices of onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.