आज कोरोना संकटाने शेतकरी मोडकळीला आला आहे. तोंडावर लागण हंगाम असताना कारखान्याने लवकरात लवकर २०० रुपये प्रतिटन कांडे पेमेंट द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी सुरेश खलाटे, रामदास आटोळे, तानाजी पोंदकुले, राजेंद्र ढवाण, विलास देवकाते, राजेंद्र बुरुंगले, लक्ष्मण जगताप, अविनाश गोफणे, हर्षल कोकरे, मधुकर मुळीक, सुनील वाघ, राजेंद्र जाधव, गजानन चव्हाण, शशिकांत खामगळ व इतर शेतकरी सभासद उपस्थित होते.
चौकट
शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केले जाईल. याबाबत कारखान्याचे संचालक मंडळ योग्य तो निर्णय घेईल, असे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले. कारखाना कांडे पेमेंटची परंपरा जपणार का, याकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागलेले आहे.
——————————————————
फोटो ओळी : माळेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांना निवेदन देताना शेतकरी.
१००६२०२१-बारामती-०१