वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:48 PM2020-01-11T15:48:47+5:302020-01-11T15:55:21+5:30

राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात  ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

The father and daughter death in accident at Rajgurunagar | वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली 

वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली 

Next

पुणे (राजगुरुनगर)  :राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात  ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,पुणे येथुन नाशिककडे जाणरा हायवा ट्रक क्र एम एच १५जी बी ७२७५ जात असताना पाठीमागुन मंचर येथे ( एमएच १४डीएल१५५७ ) दुचाकीवरून मयत सतिश बाळकृष्ण वळसे-पाटील, मुलगी आरोही सतीश वळसे पाटील व पत्नी जयश्री सतीश वळसे पाटील हे सर्व निरगुडसर (ता आंबेगाव ) हे गावाला थापलिंग यात्रेनिमित्त निघाले होते. दरम्यान सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भीमानदी पुलावर हायवा ट्रकला दुचाकी धडकली, मयत सतीश वळसे पाटील व मुलगी आरोही हे दोघे जण ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्युमुखी पडले.

पत्नी जयश्री तिलाही गंभीर दुखापत झाली आहे. मुलगी व वडील यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.  तिथे शवविच्छेदन करून वडील व मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत सतीश पुणे येथे एका कंपनीत कामाला होते.  ते पुण्यातच कुटुंबासह राहत होते. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे. ट्रक चालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय ४० ). रा. वावी ता सिन्नर , नाशिक )यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खेड पोलिस पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी करत आहेत. 

Web Title: The father and daughter death in accident at Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.