भीती... धाकधूक अन् सुटकेचा निश्वास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:15 AM2021-09-05T04:15:30+5:302021-09-05T04:15:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान ...

Fear ... a sigh of relief ...! | भीती... धाकधूक अन् सुटकेचा निश्वास...!

भीती... धाकधूक अन् सुटकेचा निश्वास...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थ दहशतीत आहे. अशात शुक्रवारी वडगाव कांदशी येथील बढे मळा येथून सांयकाळच्या सुमारास ९ वर्षांच्या मुलगा बेपत्ता झाला. बिबट्याच्या दहशतीमुळे प्रशासनासोबत संपूर्ण गाव शोधकार्यात लागले. पाच तास उलटूनही मुलगा सापडला नसल्याने भीतीसोबत धाकधूक वाढली. मात्र, अखेर घाबरलेल्या अवस्थेत मुलगा सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील बढे मळा वस्तीवर शुक्रवारी (दि.३) रात्री एक आगळेवेगळे शोध कार्याचे थरारनाट्य घडले. बढेमळावस्ती येथील शामराव बढे यांच्या शेतावर मजुरी करणारे नानाभाऊ दुधवडे यांचा ज्ञानदेव हा नऊ वर्षांचा मुलगा सायंकाळी ७ च्या सुमारास गायब झाला. परिसरात शोध घेऊनही हा मुलगा सापडत नव्हता. बिबट्याच्या दहशतीमुळे प्रशासनाने तत्परता दाखवत शोधकार्य सुरू केले. राजुरी येथील चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची ताजी घटना, वडगाव कांदळी परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली बिबट्याची संख्या, तसेच गेल्या चार दिवसांत काशिनाथ बढे यांच्या वासरावरील हल्ल्याची घटना ताजी असतांना ज्ञानदेव दुधवडे हा बिबट्याचे भक्ष्य तर पडला नाही ना या चिंतेत सर्व ग्रामस्थ होते. श्रीकांत पाचपुते यांनी प्रशासनाशी संपर्क साधत तत्काळ वनविभाग, पोलीस प्रशासन, महावितरण अशा सर्व विभागाचे अधिकारी घटनस्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात झाली. बिबटप्रवण क्षेत्रात मुलगा गायब झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. अतिशय सतर्क असणाऱ्या जुन्नरच्या प्रशासनाचा नागरिकांना प्रत्यय आला. वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, नवनपाल अरुण भालेराव, नाथा भोर, अजिंक्य भालेराव, जुन्नर वनविभागाचे कर्मचारी तसेच प्रा. श्रीकांत पाचपुते, शरद पाचपुते, योगेश पाचपुते, नवनाथ गायकवाड, प्रसाद पवार, रोहन पाचपुते या स्थानिक तरुणांनी वन विभागाच्या सूचनेनुसार शोधाशोध सुरू केली. याचवेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक मोहरे, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते घटनास्थळी दाखल होऊन शोध कार्यात सहभागी झाले. परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ऊस, मका, ज्वारी ही पिके असल्याने शोध कार्यात अडचणी येत होत्या. ६० ते ७० तरुणांनी चार तास शोध मोहीम राबवली. परंतु मुलाचा पत्ता लागत नव्हता. वनविभागालाही बिबट्याचे ठसे, खुणा काही आढळून येत नव्हत्या अशातच महावितरणच्या तांत्रिक दोषामुळे लाईट बंद झाली. महावितरणचे वायरमन बाळू केकाने, गीते, शुभम आरोटे यांनी तात्काळ या भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. या शोधकार्यामध्ये परिसरातील एक किलोमीटरचा परिसर रात्री अक्षरशः पिंजून काढला परंतु मुलाचा शोध लागत नव्हता शेवटी भीतीपोटी लपून बसलेला ज्ञानदेव बाहेर आला व लोकांनी पाच तास चालू असलेली शोधमोहीम थांबवली.

चौकट

जागरुक वन विभागाची तत्परता

ज्ञानदेव नानाभाऊ दुधवडे हा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना वन विभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली. यामधून जुन्नर वनविभागाची तत्परता ग्रामस्थांना दिसली. रात्रीची वेळ असतानाही स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऊस, मका, ज्वारीची शेती पिंजून काढली.

चौकट

पोलीस प्रशासनाचे सहकार्य

ज्ञानदेव दुधवडे गायब झाल्याची खबर मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक मोहरे यांच्यासह पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी आले व शोध कार्यात सहभाग घेतला. रात्री सातच्या सुमारास मुलगा शोधण्यात अंधार असल्याने तपासकार्यात मर्यादा येत होत्या. काही तांत्रिक कारणाने या परिसरातील वीजपुरवठा बंद होता. सदर घटना समजताच महावितरणचे वायरमन केकाने, गीते, आरोटे घटनास्थळी येऊन वीजपुरवठा सुरळीत केला.

*शोधकार्याची आमदारांकडून दखल*

बिबटप्रवण क्षेत्रात मुलगा गायब झाल्याचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्याशी श्रीकांत पाचपुते यांनी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ प्रशासनाला सूचना दिल्या व शोध कार्याच्या कामाला वेग आला. मुलाचा शोध लागेपर्यंत आमदार बेनके सतत नागरिकांच्या संपर्कात होते.

कोट

ज्ञानदेव दुधवडे हा नऊ वर्षांचा मुलगा रात्री सातच्या सुमारास गायब झाला. आम्ही तत्काळ घटना स्थळी दाखल झालो. वनविभाग, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तीन तास शोध घेऊनही मुलाचा शोध लागत नव्हता. अखेर भीतीपोटी लपून बसलेला मुलगा शेतातून बाहेर आल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

- विलास देशपांडे, पोलीस निरीक्षक, नारायणगाव पोलीस ठाणे.

काेट

शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास ज्ञानदेव दुधवडे गायब झाल्याने, परिसरात बिबट्याची दहशत असतानाही चार तास शोधमोहीम राबवूनही मुलगा सापडत नव्हता. आम्हाला बिबट्याचे ठसे किंवा खुणा काही आढळून येत नव्हत्या. त्यामुळे तपास कार्यात अडचणी येत असतानाही आम्ही एक किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. अचानकपणे लपून बसलेला मुलगा घराकडे आल्याने सर्वांना बरे वाटले.

योगेश घोडके, वनपरीक्षेत्र अधिकारी

Web Title: Fear ... a sigh of relief ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.