शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

वाहनचालक गेले भारावून; तेंडुलकर कुटुंबाकडून यंदाही दिवाळीत भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:13 PM

व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देमंगेश तेंडुलकर सातत्याने वीस वर्ष दिवाळीत वाहतूक समस्येवर व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत.अपघातांमध्ये कोणाच्याही कुटुंबातील सदस्य दगावू नयेत, यावर त्यांचा भर होता.

पुणे : वाहतूक नियम पालनाची सवय लागावी, वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे, दिवाळी भेटकार्ड म्हणून वाहनचालकांना वाटत असत. त्यांची ही परंपरा कुटुंबाने जपली आहे. 

प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर, नात श्रावणी ढवळे, शुभंकर ढवळे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विजय कदम, सचिन दांगट, वैष्णवी दांगट, मोहन आपटे, पूजा गिरी, प्रदीप गिरी, बाबा चौकसे यांच्यासह वाहन अपघातात आपल्या मुलांना गमावणारे गुरुसिद्धय्या स्वामी, शशी स्वामी आणि त्यांची कन्या स्नेहल स्वामी, तसेच वाडिया कॉलेज जवळील अपघातात आपल्या कन्येला गमावलेल्या सुनंदा जप्तीवाले सहभागी झाले होते.

बाबांना दिवाळीच्या फराळात नवीन कपडे किंवा इतर कशात ही रस नव्हता. त्यांना समाजातील उणीवा दूर करण्याचा ध्यास होता आणि विशेष करून अपघातांमध्ये कोणाच्याही कुटुंबातील सदस्य दगावू नयेत, यावर त्यांचा भर होता. वाहतूक नियम पाळा हा सोपा संदेश ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून देत असत आणि म्हणून मी आणि माझ्या मुलीने त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला, असे मंगेश तेंडुलकर यांच्या पत्नी स्नेहलता तेंडुलकर म्हणाल्या.केवळ दंडात्मक कारवाईतून नव्हे तर लोकप्रबोधनातून वाहतूक समस्या सुटू शकेल असा त्यांना विश्वास होता, मी स्वत: १३ वर्ष मंगेशजींसोबत या उपक्रमात सहभागी होत असे. त्यांच्या निधनाने दिवाळीत पोकळी जाणवत होती, पण स्नेहलता तेंडुलकर यांचा फोन आला आणि आम्ही ही परंपरा सुरु ठेवणार आहोत, असे त्यांनी मला सांगितले आणि माझी दिवाळी सत्कारणी लागली, असे मत सातत्याने १३ वर्ष या उपक्रमात सहभागी होणारे क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. कोणत्याही मोठ्या माणसाच्या निधनापश्चात त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होय, असे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.आपल्या नगरसेविका भर चौकात ऐन दिवाळीत शुभेच्छापत्र वाटत आहेत आणि वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन करीत आहेत याचे वाहनचालकांना अप्रूप वाटत होते व अनेक लोक थांबून शुभेच्छापत्र स्वीकारत होते. तर वर्षानुवर्षे या चौकात अशी भेट घेणारे अनेक नागरिक त्यांच्या आठवणी जागवत होते.

टॅग्स :diwaliदिवाळीPuneपुणे