पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर-हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाच्या पूर्वपात्रता फेरीसाठी तीन कंपन्यांनी भरलेल्या निविदा पात्र ठरल्या असून अंतिम निविदेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात आणण्यात आलेल्या नवीन मेट्रो धोरणानुसार पीएमआरडीएकडून केंद्र शासनाला मेट्रोचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.अंतिम निविदा करण्यापूर्वी करारामध्ये तांत्रिक, आर्थिक बाबी नमूद करण्यासाठी पीएमआरडी- एने नेमलेल्या व्यवहार सल्लागाराचे कामही पूर्ण झाले आहे.पस्तीस वर्षांच्याकराराची प्रत निविदा करतानाजोडली जाणार आहे. २३.३ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने २० टक्के निधीला मान्यता दिलेली आहे.शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावर उन्नत मेट्रो प्रकल्प उभारला जाणार असून ८ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ३ हजार कोटींचा निधी मिळाणार असून उर्वइरत ७० टक्के निधी पीएमआरडीएकडून उभारला जाणार आहे.सुरुवातीला काढण्यात आलेल्या जागतिक निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने १० मे व २५ मे रोजी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कंपन्या पुढे आल्या नव्हत्या. त्यामुळे २२ जूनपर्यंत तिसरी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर टाटा रिएल्टी-सिमेन्स, आयएलएफएस आणि आयआरबी याकंपन्या निविदा पूर्व पात्र फेरीत पात्र ठरल्या.जागेचा ताबापुणे आणि पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्पासाठी शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला असून ही जागा महामेट्रोला सुपूर्त करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार २.६७ हेक्टरची ही जागा महामेट्रोच्या ताब्यात येणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गिकांदरम्यान असलेल्या शिवाजीनगर या मध्यवर्ती ठिकाणावर शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो लाईनदेखील एकत्र येणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी महत्त्वाच्या ठरणाºया या जागेचा आगाऊ ताबा मिळाल्याने प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी अंतिम निविदेचे काम पूर्ण, केंद्राला प्रस्ताव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 6:12 AM