पुणे : औंध येथील स्पायसर कॉलेजशेजारी पहाटे चारदरम्यान गोडावूनला आग लागली. यात आतील साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, स्पायसर कॉलेजशेजारी असलेल्या गोडावूनचे चार भाग करण्यात आले होते. यात एक दुकान, हॉटेल तसेच गॅरेज व गॅरेजच्या मागे घर होते. पहाटे चार दरम्यान ही आग लागली. या वेळी आत कामगार झोपले होते. आग लागल्यानंतर ते त्वरीत बाहेर आले. गोडावून मालकाला आगीविषयी माहिती दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशामक दलाला या विषयी कळविण्यात आले. ३ बंबांच्या साह्याने अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत गोडावूनमधील साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान पत्र्याचे शेड असलेल्या या गोडावूनला आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
गोडावूनला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक; आगीचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:06 PM