येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:14 AM2021-03-24T11:14:44+5:302021-03-24T11:16:07+5:30

या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड, साहित्य आणि कागद जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक या विद्यार्थ्यांना तत्काळ मैदानावर घेऊन गेले.

Fire at Netaji High School's record room in Yerwada, burning old records | येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक

googlenewsNext

येरवडा- नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूमला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड जळून खाक झाले. शाळेच्या महिला सुरक्षारक्षक वैशाली काशीद यांनी प्रसंगावधान राखून वेळीच अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. 

अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी दाखल - 
घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलीस दाखल झाले आहेत. येरवड्यातील नेताजी बोस हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या रेकॉर्ड रूममधून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास धूर येत होता. यावेळी ड्युटीवर असणाऱ्या महिला सुरक्षारक्षक वैशाली काशीद यांनी चौथ्या मजल्यावर जाऊन पाहिल्यावर रेकॉर्ड रूममधून हा धूर येत होता. यानंतर त्यांनी तत्काळ शाळेच्या मुख्याध्यापिका वीना ढगे यांना आणि अग्निशमन दल व पोलिसांना घटनेची माहिती दिली. नायडू  अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन फायरगाडी व देवदूतच्या मदतीने आग आटोक्यात आणली. 

या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड, साहित्य आणि कागद जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक या विद्यार्थ्यांना तत्काळ मैदानावर घेऊन गेले. या घटनेमुळे पुन्हा एकदा  शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगीचे  नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शाळेच्या आवारातील खिडक्या तसेच ग्रीलची मोडतोड झालेली आहे. शाळेच्या आवारात  स्थानिक अपप्रवृत्तीच्या लोकांकडून नासधूस व गैरवापर केला जातो. शाळेच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासन उदासीन आहे.

नायडू अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर विजय भिलारे, फायरमन सुनील वाघमारे, हिरामण मोरे, भानुदास घुले दिलीप भालेराव, देवदूत वरील सेवक अमृता रुपनवर, आदित्य गुंजाळ, शिवाजी कोंढरे, चालक अनुप साबळे यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.
 

Web Title: Fire at Netaji High School's record room in Yerwada, burning old records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.