शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पुण्यातील पहिली डिझेल दाहिनी भोगतेय मरणकळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:50 PM

दोन वर्षांपासून ही डिझेल दाहिनी बंद अवस्थेत आहे.

ठळक मुद्देवडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी एकूण पाच दाहिनी  एका स्मशानभूमीसाठी काळजीवाहक या नावाने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती स्मशानभूमीशी संबंधित कामांची विभागणी विद्युत, स्थापत्य, आरोग्य, सुरक्षा आणि क्षेत्रीय कार्यालये यांच्याकडे

कल्याणराव आवताडे नऱ्हे  : वडगाव स्मशानभूमीमध्ये असणारी डिझेल दाहिनी ही पुणे महानगरपालिका हद्दीतील पहिली डिझेल दाहिनी आहे, मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही डिझेल दाहिनी बंद अवस्थेत असून परिसरातील गरीब, सर्वसामान्य लोकांना मात्र पैसे खर्च करून अंत्यविधी उरकावा लागत आहे. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे  अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खडतर जीवनप्रवासानंतर मानवी देहाची स्मशानभूमीतही अवहेलना होत आहे.  वडगाव येथील वीर बाजी पासलकर पुलाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी एकूण पाच दाहिनी आहेत.  त्यातील चार दाहिनी  ह्या लाकडाचा वापर करून अंत्यविधी होत असला तरी एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टीम चारही दाहिन्यांवर बसविण्यात आल्या आहेत, आणि एक डिझेलवर चालणारी दाहिनी मात्र गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मात्र पैसे खर्च करून लाकडासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागते, त्यामुळे डिझेल दाहिनी ही असून अडचण नसून खोळंबा आहे. येथील डिझेल दाहिनी ऑपरेटर विकास आवळे यांनी सांगितले की, डिझेल दाहिनी चालविताना मी तीन वेळेस बचावलो आहे. मशीनमध्ये बिघाड असल्याने ती सध्या बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. 

डिझेल दाहिनीचे वैद्यकीय विभागाकडे आणि विद्युत दाहिन्यांचे विद्युत विभागाकडे नियंत्रण आहे. स्मशानभूमी परिसराच्या स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाकडे, तर सुरक्षेचे काम सुरक्षा विभागाकडे आहे. दुरुस्तीची कामे त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांकडे आहे.  एका स्मशानभूमीसाठी काळजीवाहक या नावाने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय दोन सुरक्षा कर्मचारीही नेमणुकीस आहेत.  स्मशानभूमीशी संबंधित कामांची विभागणी विद्युत, स्थापत्य, आरोग्य, सुरक्षा आणि क्षेत्रीय कार्यालये यांच्यात झाली असल्याने येथील समस्यांकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. मात्र, योग्य ती कार्यवाही पालिकेकडून होत नाही. सदर डिझेल दाहिनीचे काम हे निकिता बॉयलर या कंपनीस दिले असल्याचे समजते. याबाबत नगरसेवक हरिदास चरवड यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, आम्ही महानगरपालिकेला नवीन विद्युत दाहिनी अथवा गॅस दाहिनी बसवावी अशाप्रकारचे पत्रही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ह्या प्रश्नावर एखाद्या अंत्यविधीच्या प्रसंगीच चर्चा होते. त्यानंतर हा प्रश्न मागे पडतो. त्यामुळेच आजही या स्मशानभूमीत असुविधा कायम आहेत.  महानगरपालिकेने या समशानभूमीतील डिझेल दाहिनी लवकरात लवकर दुरुस्ती करावी अथवा नवीन विद्युत दाहिनी बसवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

४पुणे शहरात पहिल्यांदा बसविण्यात आलेली डिझेल दाहिनी ही सध्या बंद असून, महानगरपालिकेच्या अधिकाºयांना बºयाच नागरिकांनी व राजकारण्यांनी याबाबत कळविले असतानाही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने महानगरपालिका याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. ........नातेवाइकाच्या अंत्यविधी वेळी वडगाव स्मशानभूमी येथे गेलो असता डिझेल दाहिनी बंद असल्याचे समजले, लाकडाची वखार बंद असल्याने ऐनवेळी धावपळ करून सर्व साहित्य जमा करून साध्या दाहिनीवर अंत्यविधी करावा लागला. अशावेळी रात्री-अपरात्री नातेवाइकांची कुचंबणा तर होतेच शिवाय धावपळही होते. -दादासाहेब पोकळे ......गेल्या दोन वर्षांपासून डिझेल दाहिनी बंद अवस्थेत आहे, मात्र प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असून सर्वसामान्य जनतेला मात्र याचा त्रास होत आहे. -हरिश्चंद्र दांगट , नगरसेवक ............पुणे महानगरपालिका सदर डिझेल दाहिनीबाबत मी अधिक माहिती घेतो, बंद असल्यास सुरू करण्याबाबत मी कर्मचाºयांना सूचना देतो आहे. -श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग ....सदर डिझेल दाहिनी ही कालबाह्य झाली असून, तिथे गॅस दाहिनी बसविण्याचा विचार सुरू आहे. - गोरखनाथ कांबळे प्रभारी, निकिता बॉयलर कंपनी..............महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला असून, नवीन विद्युत दाहिनी बसवावी अशी मागणी केली आहे, मात्र याबाबत ठोस निर्णय न झाल्यास आम्ही नागरिकांसह आंदोलन करू. -हरिदास चरवड, नगरसेवक 

टॅग्स :Vadhu Budrukवढू बुद्रुकDieselडिझेल