इंटर अॅक्टिव्ह पॅनल बोर्डमुळे खडू व पट्टी या पारंपरिक साधनाचा वापर न करता गणित विज्ञान व भूगोल विषयाचे अध्यापन अधिक प्रभावी करण्यास शिक्षकांना मदत होणार आहे. सदर पॅनल बोर्डमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागून मुलांना शैक्षणिक गुणवता उंचावण्यास मदत होणार आहे.
संस्थेचे सचिव विकास मांढरे यांनी संस्थेच्या माध्यमातून रायरी येथील शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक पध्दतीने शिक्षण मिळावे यासाठी शाळेला डिजिटल पँनल बोर्ड दिला असुन पुढील काळातही शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पुजा नवनाथ किंद्रे यांनी सत्काराला उत्तर देताना दिले. सूत्रसंचालन राजेंद्र किंद्रे यांनी केले आभार पांडुरंग किंद्रे यांनी मानले.
रायरी माध्यमिक विद्यालयात डिजिटल पॅनल बोर्डचे उद्घाटन करताना मान्यवर.