पहिला जातपंचायत खटला; आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:06 AM2017-11-27T05:06:24+5:302017-11-27T05:06:38+5:30
बेकायदेशीर जातपंचायत बसवून ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी़ टी़ शेजवळ काळे यांनी ८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़
पुणे : बेकायदेशीर जातपंचायत बसवून ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी़ टी़ शेजवळ काळे यांनी ८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ असा गुन्हा दाखल होण्याचे हे राज्यातील पहिले प्रकरण होते.
नेमाराम चांदमल बोलद्रा (४८), भरतलालजी रूपचंदजी धर्मावत (६६), देवाराम मंगनीराम धर्मावत (६४), गोविंद पोपटलाल डांगी (५८), भवरलाल मोहनलाल मावाणी (५८), भवरलाल कणीराम धर्मावत (५५), गोविंद लक्ष्मण धर्मावत (५९), रामलाल कन्हैयालाल डांगी (५५) अशी दोषमुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
१९ मे २००४ ते १० जुलै २०१३ दरम्यान घडलेल्या या प्रकरणात संतोष सुखलाल शर्मा (४७) यांनी फिर्याद दिली होती़ त्यांनी ब्राह्मण मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता़ आरोपी राजस्थानी ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजातील जातपंचायतीचे अध्यक्ष व पंच आहेत. त्यांनी फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धार्मिक कार्यातून बाहेर काढून जिवे मारण्याची धमकी दिली.
़़़ म्हणून सुटका\
आरोपी श्री गौड ब्राह्मण समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती, मोठे उद्योजक व व्यावसायिक आहेत़ फिर्यादींनी ट्रस्टवर जाण्यासाठी, आरोपींना बदनाम करून त्रास देण्यासाठी तब्बल १० वर्षांनी खटला दाखल केला, हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली़