इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.उजनी धरणाच्या दक्षिणेला नीरा नृसिंहपूरकडे जाणा-या भीमा नदीच्या काठावरील बाभूळगाव,भाटनिमगाव,बेडशिंगे,अवसरी,सुरवड,वडापूरी, आदीं गावे वसलेली आहे. गावे वसलेली आहेत. या गावांच्या परिसरात हजारो एकर शेतजमिनी आहेत. ऊस,हळद,डाळिंब,ऊन्हाळी पिके घेतली जातात. लाखो रुपये खर्चून जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. ऊन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी आटले आहे.लाखो जलचर प्राणी चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. तसेच अनेक जलचर प्राणी चिखलात जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना पकडण्यासाठी अबालवृध्दांची कोरड्या पात्रातील चिखलात धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. जलचरांच्या या भयाण समस्येबरोबरच या भागातील पिकेसुध्दा वाळून चालल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे,अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे .
भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीत पाण्याअभावी मासे मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:09 PM
इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीवदान द्यावे,अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देऊन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी आटले आहे.लाखो जलचर प्राणी चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे .