पुरंदरच्या सहा गावांतील पाणी योजनांसाठी पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:00+5:302021-06-11T04:08:00+5:30
पूर्वीच्या योजनेच्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने, तसेच पाण्याच्या अपुऱ्या उद्भवामुळे बंद झाल्याने नवीन योजना करण्यात येत आहेत. गुळुंचे गावासाठीची नळ ...
पूर्वीच्या योजनेच्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने, तसेच पाण्याच्या अपुऱ्या उद्भवामुळे बंद झाल्याने नवीन योजना करण्यात येत आहेत. गुळुंचे गावासाठीची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित किंमत १ कोटी ५५ लाख रुपयांची आहे. नवीन योजनेत गुळुंचे गावठाण, वाड्यावस्त्यांसाठी स्वतंत्र पाझर विहीर, नवीन पंपगृह, स्वतंत्र साठवण टाक्या व पंपिग स्टेशन मशिनरी याचा समावेश आहे. सोमुर्डीच्या नवीन योजनेची किंमत ४० लाख रुपये आहे. मांडकी गाव आणि खंडोबा वस्तीसाठी १ कोटी ६० लाख रुपयांची योजना होत आहे. वनपुरी योजना ७३ लक्ष रुपये, उदाचीवाडी ६० लक्ष रुपये, झेंडेवाडीची योजना ४७ लक्ष रुपयांची आहे. या सर्व योजनांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती संजय जगताप यांनी दिली. या बैठकीला अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, सहायक अभियंता आर. डी. गायकवाड उपस्थित होते, अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली.