एटीएम केंद्रातून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाच्या खात्यातून पाच लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:22+5:302021-07-14T04:13:22+5:30
पुणे : एटीएम केंद्रात रोकड काढणा-या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करून चोरट्यांनी त्यांचे डेबिट कार्ड चोरून खात्यातून ५ लाखांची रोकड ...
पुणे : एटीएम केंद्रात रोकड काढणा-या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करून चोरट्यांनी त्यांचे डेबिट कार्ड चोरून खात्यातून ५ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मार्केट यार्ड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार मार्केट यार्ड भागात राहतात. सहा महिन्यांपूर्वी ते लष्कर भागातील इस्ट स्ट्रीटवर असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यापाठोपाठ एक चोरटा एटीएम केंद्रात शिरला. चोरट्याने त्यांना एटीएम यंत्रातून रोकड काढून देण्याच्या बहाणा केला. त्यांच्याकडील डेबिट कार्ड घेतले. त्यानंतर यंत्रातून पैसे निघत नसल्याची बतावणी करून चोरट्याने त्यांना दुसरेच डेबिट कार्ड दिले.
चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाचे डेबिट कार्ड स्वत:जवळ ठेवले. चोरट्याने ज्येष्ठाच्या डेबिट कार्डचा पासवर्ड चोरला होता. त्याचा दुरूपयोग करून चोरट्याने त्यांच्या खात्यातून ५ लाख ८ हजार रुपयांची रोकड लांबविली.