हडपसर मेट्रोसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:22 AM2021-03-13T04:22:05+5:302021-03-13T04:22:05+5:30
हडपसर भाग झपाट्याने वाढत असल्याने तसेच नवीन गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केल्यामुळे हडपसर भागातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत ...
हडपसर भाग झपाट्याने वाढत असल्याने तसेच नवीन गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केल्यामुळे हडपसर भागातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालेला आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे नाना भानगिरे यांनी मेट्रोच काम लवकरच चालू करण्यासाठी पाठपुरावा केला. या वेळी स्वतः मुख्यमंत्री यांनी आपल्या पत्राद्वारे काम लवकरच चालू होईल व या पुढील पाठपुरावा कशाद्वारे चालू आहे, याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
तसेच प्रभाग क्र.२६ मध्ये असलेल्या वनविभागात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. या मध्ये कोणत्याही झाडाला न धक्का लावता तेथे गार्डन करून ज्येष्ठ नागरिक ,महिला ,लहान मुले मुली तेथील रहिवासासाठी गार्डन सुशोभीकरण लवकरात लवकर माझ्या भागातील नागरिकांना याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ही विनंती पत्राद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे यांनी विनंती केली आहे. नाना भानगिरे
तसेच या गार्डनला नाव माँसाहेब मीनाताई ठाकरे हे नाव द्यावे. असे सूचित करण्यात आले. या वेळी पर्यावरण मंत्री यांनी आपल्या पत्राद्वारे लवकरच यावर उपाययोजना करू असे पत्रात नमूद केले आहे.
या वेळी नाना भानगिरे लवकर याचा संपूर्ण पाठपुरावा करून हे कार्य मार्गी लावण्यास सक्रिय राहतील. प्रभाग क्र. २६ मध्ये सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी तसेच ससाणेनगर, हंडेवाडी रोड, महमंदवाडी रोड तसेच काळेपडळ भागात प्रलंबित असलेला वाहतुकीचा प्रश्न लवकर मार्गी लावा. यासाठीही पाठपुरावा केला आहे, असे भानगिरे यांनी सांगितले.
कोट
-
शिवाजीनगर-हडपसर-लोणी काळभोर व हडपसर ते सासवड रोड अशी मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहे. त्यानुसार प्राधिकरणामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर ते हडपसर या मुख्य मार्गिकेचा व हडपसर (गाडीतळ) ते सासवड रोड (मंतरवाडी फाटा) या विस्तारीत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याठी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन यांना आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन यांच्यामार्फत सद्यस्थितीमध्ये दोन्ही मेट्रो मार्गिकांचे सविस्तर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असुन मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन यांच्यामार्फत प्रगतीत आहे.
-रिनाज पठाण
अधीक्षक अभियंता,
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे