बारामती : राष्ट्रीयीकृत बँकांना भाजपा भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने अधिकाऱ्यांनी सक्तीने कर्जवसुली करू नये याबद्दल पत्र व्यवहार करण्यात आला आहे. भाजपा भ.वि.आ विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी बँक ऑफ महाराष्ट्राला पत्र पाठवले आहे. यामध्ये कोरोना महामारी मध्ये सलग दोन वर्षे राज्याने कमी-अधिक प्रमाणात लॉकडाऊन सोसले आहे.
त्यानुसार या काळात सर्वच प्रकारच्या उद्योग-धंद्यात प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. अशात आर्थिक परिस्थिती लगेच पूर्वत होणे शक्य नाही, लघुद्योजक, महिला उद्योजक, शेतमाल विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी यांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण आहे किंबहुना शक्यच नाही. मग किमान वसुलीमध्ये सवलत देण्यात यावी. कर्जदारांना वेठीला धरून खाती ब्लॉक करणे, जामिनदाराच्या खात्यातून हप्त्यांचे पैसे कापून घेणे, जप्तीची नोटीस बजावणे अशा अन्य गोष्टी किमान पुढची दोन वर्षे करू नयेत, असे या पत्रात नमूद केले आहे. तसेच वसुली ग्राहकांच्या ऐपतीनुसार करावी. सक्तीने वसुली करत असताना ग्राहक अथवा त्यांच्या घरातील व्यक्तीला काही बरेवाईट झाल्यास सबंधितांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याचा इशारा वाकसे यांनी दिला आहे.
————————————————