डेक्कन कॉलेजचे माजी संचालक डॉ. मधुकर ढवळीकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 06:39 AM2018-03-28T06:39:24+5:302018-03-28T06:39:24+5:30
डेक्कन कॉलेजचे निवृत्त संचालक आणि भारतीय पुरातत्व शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे निधन
पुणे : डेक्कन कॉलेजचे निवृत्त संचालक आणि भारतीय पुरातत्व शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे मंगळवारी रात्री खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. 2011 मध्ये केंद्र शासनाने त्यांना पदमश्री किताबाने गौरवले होते. 'भारताची कुळकथा', 'लढा टाकलेल्या स्त्रियांचा' आदी पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
म.के.ढवळीकर यांचा जन्म १६ मे १९३० रोजी पाटस येथे झाला. त्यांनी १९५२ मध्ये पदवी तर 1958 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना पुणे विद्यापीठाकडून पुरातत्व शास्त्रातील पीएचडी पदवी बहाल करण्यात आली.
ढवळीकर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अकेडमीक कौन्सिलचे संचालक आणि बृहनमहाराष्ट्र प्राच्यविद्या परिषेदेचे अध्यक्ष होते.