खेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:50 PM2018-06-25T19:50:29+5:302018-06-25T19:51:13+5:30

पुण्यावरून साताऱ्याकडे मोटार चालली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला मागून मोटारीने जोरात धडक दिली.

Four people died in a horrific accident near Khed-Shivapur Toll plaza | खेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार

खेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार

Next

खेड-शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ मोटारीची उभ्या ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार  झाले. यात शिंदेवाडी येथील एक व पुण्यातील तिघांचा समावेश आहे.
हा अपघात सोमवारी (दि २५ जून ) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. मृतांमध्ये ओंकार पोळ (वय २७, शिंदेवाडी, भोर, मूळ रा. सांगली), अश्विनी असवले (वय ३६, पुणे स्वारगेट),  उज्वला सणस (वय ३५, वडगाव धायरी, पुणे),  अरुणा भोसले  (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. 
पुण्यावरून साताऱ्याकडे मोटार (एचएच १२, एचझेड 0२८९) चालली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला मागून मोटारीने जोरात धडक दिली. यात मोटारीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. 
राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून साता-याला जाणा-या आयटेन कारमध्ये कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्वला सणस आणि अश्विनी असवले या तीन महिला महिला प्रवास करत होत्या. खेड-शिवापूर टोलनाक्यापूर्वी काही मीटर अंतरावर एक ट्रक उभा होता. 
 दरम्यान, कारचालक ओंकार पोळ याचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर पाठीमागून आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ही कार ट्रकमध्ये जाऊन फसली. या कारला क्रेनच्या साहाय्याने ओढून काढावे लागले. चालकासह जखमी झालेल्या तीनही महिलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी सातारा याठिकाणी चालले होते. येथील हॉटेल सागरच्या समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मोटार धडकली. या अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावर होणारे अनधिकृत पार्किंग व रस्त्यांची अपूर्ण कामे हा प्रश्न समोर आला आहे. 
 
.......................

Web Title: Four people died in a horrific accident near Khed-Shivapur Toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.