अपघात दाव्यातून उघड झाली विमा कंपनीची फसवणूक; लष्कर पोलिसांकडे फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:55 PM2018-01-08T12:55:11+5:302018-01-08T13:00:01+5:30

दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

fraud disclosed by the insurance company after accidental claim; Complaint against the Army Police | अपघात दाव्यातून उघड झाली विमा कंपनीची फसवणूक; लष्कर पोलिसांकडे फिर्याद

अपघात दाव्यातून उघड झाली विमा कंपनीची फसवणूक; लष्कर पोलिसांकडे फिर्याद

Next
ठळक मुद्देयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे़, २०१२ मध्ये घडला होता प्रकारकंपनीने कागदपत्रे पडताळणी केली, त्यानंतर पॉलिसी बनावट असल्याचे झाले़ निष्पन्न

पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली़ त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले़ त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे़ आतापर्यंत दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे़ 
याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे़ हा प्रकार २०१२ मध्ये घडला होता़ याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर येथील मोटार अपघात न्यायालयात एक दावा दाखल करण्यात आला आहे़ त्यातील क्लेमबाबत दाखल करण्यात आलेल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे कंपनीला मिळाली़ कंपनीने त्याची पडताळणी केली, तर ती पॉलिसी बनावट असल्याचे निष्पन्न झाले़ बाबासाहेब महादेव कुदळे यांना एकाने फोन करून पॉलिसी उतरून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पॉलिसी काढून दिली होती़  
पैगंबर इस्माइल शेख हे आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आले होते़ त्यांनाही बनावट पॉलिसी दिल्याचे उघड झाले़ त्यानंतर कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत़ 
 

Web Title: fraud disclosed by the insurance company after accidental claim; Complaint against the Army Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे