इंदापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:24+5:302021-08-22T04:14:24+5:30
इंदापूर : इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांची रुबी हॉल, पुणे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली ...
इंदापूर : इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांची रुबी हॉल, पुणे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची ईसीजी, ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, हृदयविकार तसेच डोळे व संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, सचिव हनुमंत शिंदे, प्रमोद भंडारी, नंदकुमार गुजर, पांडुरंग जगताप, भाऊसाहेब खबाले, अरुण नाडगौडा, आबा चौधरी, खुळेदादा, संचालिका छाया जाधव, लता देशपांडे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये रक्तगट तपासणी व वृक्षारोपणसारखे सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच दर महिन्याला आम्ही त्या महिन्यातील ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवस साजरे करतो, सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करतो. तर संघाच्या सर्व सभासदांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करणार असल्याची ग्वाही या वेळी गुजर यांनी दिली.
या वेळी रुबी हॉलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश खडतरे, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानदेव शेंडे यांनी ज्येष्ठ नागरिक संघास सहकार्य करून, एकूण ८३ सभासदांची संपूर्ण आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक संघाचे एकूण सभासद ५५० आहेत. या वर्षी नवनीत शेठ शहा यांनी संघाच्या इमारती परिसरात मोफत फरशी बसवून दिली. त्यामुळे त्यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला व नवनीत शहा यांचे आभार मानण्यात आले.
फोटो ओळ : इंदापूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिक व मान्यवर.