पुणे : नरेंद्र माेदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी साेहळा राष्ट्रपतीभवन येथे पार पडत आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नरेंद्र माेदी आज पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असल्याने पुण्यातील नमाे अमृततुल्यकडून पुणेकरांना माेफत चहा वाटण्यात आला. संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हा माेफत चहा देण्यात आला. यावेळी शेकडाे पुणेकरांनी चहाचा लाभ घेतला.
आज पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. माेदी पुन्हा पंतप्रधान हाेणार या आनंदात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाचे आयाेजन केले हाेते. पुण्यात अनेक ठिकाणी सत्यनारायण पुजा आयाेजित करण्यात आली हाेती. तर काही ठिकाणी मिठाई वाटण्यात आली. पुण्यातील सदाशिव पेठेत सुरु करण्यात आलेल्या नमाे अमृततुल्य येथे माेदींच्या शपथविधी निमित्त माेफत चहाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे माेदींकडून प्रेरणा घेऊनच हे नमाे अमृततुल्य सुरु करण्यात आले आहे. अमृततुल्यच्या शेजारी एक स्टेज उभारुन तेथे माेदींची प्रतिमा आणि ते भाषण करत असल्याचा देखावा उभारण्यात आला हाेता. त्याचबराेबर साऊंडवर माेदींची विविध भाषणे लावण्यात आली हाेती.
या उपक्रमाबाबत बाेलताना प्रमाेद काेंढरे म्हणाले, पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र माेदी आज दिल्लीत घेत आहेत. माेदींकडून प्रेरणा घेऊनच नमाे अमृततुल्य सुरु करण्यात आले आहे. माेदींच्या शपथविधी निमित्त आज माेफत चहा देत आहाेत. फटाके न वाजवता माेफत चहा देऊन माेदी पंतप्रधान झाल्याचा आम्ही आनंद साजरा करत आहाेत.