मुठा आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोफत गाडीची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:07+5:302021-04-12T04:09:07+5:30
शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या मोफत गाडीचा फायदा हा मुठा खोऱ्यातील दुर्गम अशा भागामधील नागरिकांना चांगलाच होणार असून मुठा ...
शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या मोफत गाडीचा फायदा हा मुठा खोऱ्यातील दुर्गम अशा भागामधील नागरिकांना चांगलाच होणार असून मुठा खोऱ्यातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी याचा फायदा घेत आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील शिवसेनेचे उपजिल्हा संघटक सचिन दगडे यांनी केले आहे.
तत्पूर्वी या गाडीचे उद्घाटन हे शिवसेनेचे बारामती लोकसभेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा याप्रसंगी आरोग्य अधिकारी रामदास ताटे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जि. प. सदस्य सागर काटकर, उपजिल्हा संघटक सचिन दगडे, तालुकाप्रमुख सचिन खैरे, भोर विधानसभा समन्वयक कैलास मारणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तुषार पवळे, सरपंच प्रफुल मारणे, वैभव पवळे, मोहन आवाळे,उपतालुकाप्रमुख शिवाजी उभे, उपजिल्हा संघटक सचिन दगडे, तालुका संघटक अमित कुढले, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे, आझाद दगडे, वसंत उभे, शाखा प्रमुख भरत उभे, विजय मारणे व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन उपजिल्हा संघटक सचिन दगडे, तालुका संघटक अमित कुढले यांनी केले होते.
ृृृृृृृृृृृृृृृृृृृृफोटो ओळ : शिवसेनेच्या वतीने मुठा खोऱ्यातील नागरिकांसाठी लसीकरणासाठी येजा करण्यासाठी करण्यात आलेल्या गाडीच्या उद्घाटन.
Attachments area