Pune Corona News: शहरात शुक्रवारची रुग्णसंख्या शंभरीच्या आत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:43 PM2021-10-22T21:43:47+5:302021-10-22T21:44:04+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ७६३ संशयितांची तपासणी करण्यात आली
पुणे : शहरात शुक्रवारी ९१ कोरोनाबाधित आढळून आले असून, ११३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ७६३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.५७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ९६० इतकी आहे. आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्युदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १६० इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या १४९ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३५ लाख ६ हजार ३१० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ३ हजार ६३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ९३ हजार ६१० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.