याप्रकरणी किरण हेमंत ढोले (वय ३०, रा. सावतामाळी मंदीर, गोंधळेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता चौधे या हडपसर मार्केटमध्ये भाजी विक्री करण्याचे काम करतात. त्यांचे पती किसन व किरण ढोले हे दोघे मित्र असून त्यांचा हडपसर मार्केटमध्ये गाळा आहे.
गुरुवार (११ मार्च) रोजी सकाळी अकराच्या सुमारास नीता या घरांस बाहेरुन कुलूप लावून भाजी विक्री करण्यासाठी हडपसर मार्केटमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी साडेपाच्या सुमारास त्यांना किरण ढोले याने फोन करून मामा किसन हे जास्त दारू प्याले असून त्यांना मी घरी
सोडतो व लॉक लाऊन चावी तुमच्याकडे आणून देतो, असे सांगितले. त्यानंतर किरणने चावी घेतली व परतही आणून दिली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास त्या घरी गेल्या. लॉक खोलून आत जाऊन पाहिले. त्यावेळी पती हॉलमध्ये झोपले होते. बेन्टेक्सचे गंठण दिवाणावर होते. त्यांनी कपाट उघडून पाहिले असता त्यांना कपाटातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम दिसली नाही.
म्हणून त्यांनी उरुळी देवाची दूरक्षेत्रात जावून ६० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे दोन कानाचे झुमके, २८ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे अक्कासाहेब डोरले, २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, १६ हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या लेडीज अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याचा लहान गणपतीची मूर्ती, व ९० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख २६ हजार रुपये किमतीचा ऐवज किरण ढोले याने चोरून नेला असल्याची फिर्याद दिली आहे.