वाहनांवर इंधनदरवाढीचे स्टिकर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:02+5:302021-07-21T04:09:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसने इंधन दरवाढीच्या विरोधात सुरु केलेल्या आंदोलनात वाहनधारकांना सहभागी करून घेतले आहे. दरवाढीबद्दल केंद्र ...

Fuel price stickers on vehicles | वाहनांवर इंधनदरवाढीचे स्टिकर्स

वाहनांवर इंधनदरवाढीचे स्टिकर्स

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसने इंधन दरवाढीच्या विरोधात सुरु केलेल्या आंदोलनात वाहनधारकांना सहभागी करून घेतले आहे. दरवाढीबद्दल केंद्र सरकारचा निषेध करणारे स्टिकर्स वाहनांवर लावण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुण्यात काँग्रेस भवनात सुरुवात करण्यात आली.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सर्व प्रकारच्या वाहन चालक मालकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. त्यानुसार चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. चव्हाण यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी झाले. तरी केंद्रातील मोदी सरकार जाचक कर आकारून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करत आहे. वाहनचालकांनी याचा निषेध करावा असे आवाहन चव्हाण यांनी केले. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, ॲड अभय छाजेड, काँग्रेस गटनेते आबा बागूल, नगरसेवक अजित दरेकर, गौरव बोराडे उपस्थित होते.

Web Title: Fuel price stickers on vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.