बारामती :
कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील जवान बिंटू राजाराम सुळ (वय ४४) यांचे जम्मू काश्मिर येथील उधमपूर याठिकाणी मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) कर्त्यव्य बाजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि. २) बिंटू सुळ यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कोऱ्हाळे येथे आणण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येनी ग्रामस्थ उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात सुळ यांची अंत्ययात्रा निघाली होती.
त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे. सैन्यदलामध्ये त्यांची १४ वर्षांची सेवा पूर्ण झाली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. पुणे येथील सैन्यदलाच्या तुकडीने सुळ यांचे पार्थिव कोऱ्हाळे बुद्रुक येथे आणले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम्, जवान बिंटू राजाराम सुळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. तर सुळ यांच्या निधनामुळे कोऱ्हाळे बुद्रुक गाव बंद ठेवण्यात आले. तर तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, शासकिय अधिकाऱ्यांनी सुळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली होती. सुळ यांचे वडील मेंढपाळ होते. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमधून शिक्षण घेऊन जिद्दीने ते सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे ग्रामस्थ शोकाकुल झाले. तर त्यांच्या आठवणी सांगताना मित्रपरिवाराचे डोळे पाणवले होते. शासकिय इतमामात सुळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------
फोटो : जवान बिंटू सुळ
०२०१२०२१-बारामती-२०
------------------------
फोटो ओळी : कोºहाळे बुद्रुक येथे जवान बिंटू सुळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेला जमाव
०२०१२०२१-बारामती-२१
-------------------------