अंत्यसंस्काराचा खर्च महापालिका करणार
By admin | Published: April 25, 2016 01:25 AM2016-04-25T01:25:25+5:302016-04-25T01:25:25+5:30
पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारण्याचा प्रस्ताव सभेने मंजूर केला.
रहाटणी : पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारण्याचा प्रस्ताव सभेने मंजूर केला. बेवारस मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सर्वसाधारण सभेत या विषयीचा विषय मंजूर केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार आहे. मात्र, पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकडे उपलब्ध करून देण्याचा खर्च पालिका देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. गॅसदाहिनी, विद्युतदाहिनी आणि दफनभूमी यांमधील अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी पालिका घेणार आहे. तसेच, बेवारस मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातील, अशी उपसूचना मंजूर केली.
स्मार्ट सिटी योजनेच्या यादीतून ऐनवेळी वगळल्यानंतर महापालिकेचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा, जलनि:सारण, उद्यान, पावसाळी गटर योजना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या प्रकल्पांना
मंजुरी मिळाली. त्याचा सुमारे तीन हजार १९८ कोटी रुपये खर्चाचा आराखडा प्रशासनाने तयार
केला आहे. त्यापैकी एक हजार
६६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून, ५३३ कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. उर्वरित एक हजार ५९९ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला उभारावी लागणार आहे. (वार्ताहर)