पुणे विमानतळावर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री, प्रवाशाला मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:24 PM2018-05-08T18:24:24+5:302018-05-08T19:33:05+5:30

पुणे विमानतळावरुन दिल्लीला प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एअरपाेर्टवर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री केल्याचे समाेर अाले अाहे. याबाबत प्रवाशाने ट्विट करत तक्रार नाेंदवली अाहे.

fungal found in food at pune airport | पुणे विमानतळावर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री, प्रवाशाला मनस्ताप

पुणे विमानतळावर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री, प्रवाशाला मनस्ताप

Next

पुणे : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशाला विमानतळावरील एका फूड स्टाॅलवर बुरशी लागलेला पदार्थ विकल्याचे समाेर अाले अाहे. प्रवाशाने तक्रार केल्यानंतरही याबाबत कुठलिही दखल न घेतल्याने प्रवाशाला नाहक मनस्तापाला समाेरे जावे लागले.  त्यामुळे एकीकडे पुणे विमातळावर प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांना चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळणार का, असा प्रश्न विचारला जात अाहे. 
    रुपेश राय यांच्यासाेबत हा प्रकार 25 एप्रिल राेजी घडला. राय हे रात्रीच्या 10.45 च्या फ्लाईटने दिल्लीला चालले हाेते. त्यांनी एअरपाेर्टवरील एका फूटस्टाॅलवरुन व्हेज पफ खाण्यास घेतले. त्यावेळी ते ताजे नसल्याचे त्यांच्या लक्षात अाले. त्यांनी खाण्यास घेतले असता त्याचा कुजट वास येत हाेता. त्यांनी ते खाेलून पाहिले असता त्याला बुरशी लागली हाेती. त्यांनी याबाबत स्टाॅलवरील कर्मचाऱ्याला सांगितले. कर्मचाऱ्याने ते घेऊन न बघताच कचरापेटीत टाकून दिले, त्यांना त्या पदार्थाचा फाेटाेही काढू दिला नाही. तसेच वातावरणात उष्णता असल्याने ताे व्हेज पफ खराब झाला असेल असे सांगितले. याबाबत त्यांनी एअरपाेर्टवरील अधिकाऱ्यांना सांगितले असता, त्यांनीही या घटनेला फारसे गांभिर्याने घेतले नाही. तसेच त्याच फूड स्टाॅलवरील एका वहीत याबाबत तक्रार करण्यास सांगितले. या सगळ्याचा राय यांना मनस्ताप झाला. त्यांनी दिल्लीला गेल्यानंतर याबाबतचे ट्विट केले. त्यावर तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल असे रिट्विट एअरपाेर्ट अाॅथाेरिटीकडून करण्यात अाले. 
    यापूर्वीही काही प्रवाशांनी एअरपाेर्टवरील खाद्यपदार्थांबाबत तक्रारी केल्या हाेत्या. त्यामुळे एअरपाेर्टवरील खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. याबाबत बाेलताना पुणे विमानतळाचे संचालक अजय कुमार म्हणाले, अाम्ही प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतली असून संबंधित स्टाॅल चालकाला नाेटीस बजावली अाहे. प्रवाशाकडे या घटनेबाबतचे कुठलेही पुरावे नाहीत. अाम्ही स्टाॅल चालकाकडे चाैकशी करत अाहाेत. गरज पडल्यास प्रवाशाकडून अधिक माहिती घेण्यात येईल.

Web Title: fungal found in food at pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.