याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सचिन जतकर, शेखर भोईर, निखिल गिरीगोसावी, स्वप्निल गाढवे, विशाल कोठावले याच्या पथकाने वाडारोड येथे रात्रीची नाकाबंदी केली होती. दरम्यान दि.१६ रोजी रात्री पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांना एक युवक संशयितरित्या फिरताना दिसून आला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. युवकाचे नाव विचारून अंगझडती घेतली असता. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी आरोपी सागर घनवट याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
१७राजगुरुनगर कारवाई
गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या युवकासवमेत पोलीस.