इंद्रायणी घाटावर उभारले गणेशमूर्ती संकलन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:30+5:302021-09-19T04:11:30+5:30
अनंत चतुर्दशी अर्थातच गणेश विसर्जन दिनाच्या पार्श्वभूमीवर पवित्र इंद्रायणी नदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स व पत्रे लावून बंद करण्यात ...
अनंत चतुर्दशी अर्थातच गणेश विसर्जन दिनाच्या पार्श्वभूमीवर पवित्र इंद्रायणी नदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स व पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपती विसर्जनासंदर्भात माहितीचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. दोन्ही मूर्ती संकलन केंद्रांवर पालिकेने दहा कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे आळंदीत गणेशमूर्ती विसर्जन करण्याकरिता आलेल्या गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह न धरता संकलन केंद्रावर आपल्या मूर्ती जमा करायच्या आहेत. संकलन केंद्राहून चार वाहनांच्या साह्याने मूर्ती मोशी येथे विधिवत विसर्जनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
गणेश विसर्जनासाठी मिरवणुकीला बंदी आहे. त्यामुळे या कालावधीत सर्वांनी शांतता व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. रविवारी इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.
१८ आळंदी इंद्रायणी
१८ आळंदी इंद्रायणी १
आळंदीत नदी घाटावर उभारण्यात आलेले मूर्ती संकलन केंद्र. दुसऱ्या छायाचित्रात इंद्रायणीकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्स व पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.