नारायणगाव व वारूळवाडी परिसरात ११ तासांत गणपती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:01+5:302021-09-21T04:13:01+5:30
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास देशपांडे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी गणेशोत्सवासाठी २ पोलीस ...
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास देशपांडे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी गणेशोत्सवासाठी २ पोलीस उपनिरीक्षक ,४१ पोलीस कर्मचारी, ३१ वार्डन, होमगार्ड, ७ विशेष पोलीस आधिकारी, पोलीस पाटील बंदोबस्तासाठी तैनात होते. सर्व गणपतींचे मिना नदीच्या पात्रात दोन्ही बाजूने किनारी विसर्जन करण्यात आले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पारंपरिक वाद्ये वाजविण्यात आली. शांततेत गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे कोणतेही देखावे सादर करण्यात आले नाही.
सर्वात प्रथम खोडद रोड येथील आदर्श मित्र मंडळाने साध्या पद्धतीने मिरवणुकीस सुरुवात केली. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच योगेश बाबू पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्षी विसर्जनासाठी आलेले सर्व गणेश मूर्तीसाठी कृत्रिम टँक तयार करून त्यामध्ये मूर्तींचे विसर्जन केले व गोळा केलेल्या निर्माल्याचे प्लास्टिक व नैसर्गिक निर्माल्य असे दोन विभागांत वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ राहण्यासाठी व पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी एकही मूर्ती नदीच्या पात्रात विसर्जित केली नाही. वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निर्माल्य गोळा केले. यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. संत शिरोमणी सावता महाराज मित्र मंडळ आनंदवाडी यांनी पारंपरिक पद्धतीने गणपती मूर्ती यांचे कृत्रिम टँक तयार करून त्यामध्ये विसर्जन केले. आदर्श मित्र मंडळ, खोडद रोड, मुक्ताबाई तरुण मित्र मंडळ, मुक्ताई मंदिर चौक, कोल्हेमळा येथील संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट, नारायणवाडी येथील औंदुबर मित्र मंडळ, पाटे आळी विरोबा मित्र मंडळ, वाजगेआळी येथील विक्रांत क्रीडा मंडळ, नारायणवाडी गणेश मित्र मंडळ, औदुंबर स्वराज्य मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, शिवझुंजार मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, प्रगती मित्र मंडळ, शिवविहार मित्र मंडळ व वारूळवाडी येथील भागेश्वर मित्र मंडळ, नवशक्ती मित्र मंडळ, नवझुंजार मित्र मंडळ, सिद्धिविनायक फेज-१, भळगट हेरिटेज, संस्कृती फेज-१,२,३ व विविध मंडळांनी साध्या पद्धतीने गणरायाचे विसर्जन केले.
---
फोटो क्रमांक : २० नारायणगाव गणेश विसर्जन१
फोटो क्रमांक - २० नारायणगाव गणेश विसर्जन-२
फोटो ओळी : नारायणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी केलेल्या कृत्रिम टँकमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात आले .
फोटो ओळी २ - वारूळवाडी येथील श्री सिद्धिविनायक फेज-१ गणेश मित्र मंडळ गणरायाला भावपूर्ण निरोप देताना.
200921\img_20210919_141436.jpg
वारूळवाडी येथील श्री सिध्दीविनायक फेज-१ गणेश मित्र मंडळ गणरायाला भावपुर्ण निरोप देताना .