अतुल चिंचली
पुणे : गेल्या अकरा महिन्यांमध्ये सिलिंडरच्या किमतीत सुमारे दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडत आहे. दर महिन्याला ही वाढ होत असल्याने लवकरच हजार रुपये सिलिंडरसाठी मोजावे लागण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित सिलिंडर ९३४ रुपयांवर गेले आहे. यंदाच्या वर्षी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिक, व्यावसायिक, विक्रेते या वाढत्या दरामुळे संतापले आहेत. जानेवारी २०१८ पासून प्रत्येक महिन्यात दरवाढ झालेली आहे. त्यामुळे आमच्या बजेटवर परिणाम होत असून, ही दरवाढ कमी झाली पाहिजे, अशी मागणी शहरातील विक्रेते व व्यावसायिक हॉटेल यांनी व्यक्त केले.
या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत पुण्यात ९३४ रुपये झाली आहे. पाच किलो सिलिंडरची किंमत ५०१ रुपये आहे. १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत १५९९ रुपये, तर ४७ किलोची किंमत ३९९५ रुपये आहे. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा दरवाढ झाली आहे. १ नोव्हेंबरला पुण्यातील घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत विनाअनुदानित ९३२ रुपये होती. ७ नोव्हेंबरला ती ९३४ रुपये झाली. कमर्शियल सिलिंडरची किंमत जानेवारी २०१८ पासून दर महिन्याला वाढत आहे. जानेवारीत या सिलिंडरची किंमत ११०० रुपये होती, ती आता १६०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जीएसटी आणि इतर कारणांमुळे दर वाढ होत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी व विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी गॅस सिलिंडर स्वस्त दरात मिळत होते. ही दैनंदिन वस्तू असल्याने दरात सातत्याने होणारी वाढ महिन्याच्या बजेटवर परिणाम करणारी असते. त्यामुळे अशी दरवाढ करू नये, अशी मागणी हाते आहे. सिलिंडर बुक केले जाते, तेव्हा दर कमी असतो. परंतु, सिलिंडर घरी आल्यानंतर त्याचे दर वाढलेले असतात. त्यामुळे त्या दराने ते घ्यावे लागते. ही नागरिकांची लूटच होत असल्याची टीकाही नागरिकांनी केली. फाईव्हस्टार हॉटेलसाठी एका महिन्यात २५० ते २८० सिलिंडरची गरज भासते. वडापाव हातगाडी, पुलाव हातगाडी यांना एका महिन्याला किमान चार कमर्शियल सिलिंडर घ्यावे लागतात, तर स्नॅक्स सेंटर, हॉटेल यांना एक महिन्याला दहा ते बारा सिलिंडरची गरज लागते. त्यामुळे त्यांना या दराचा फटका बसत आहे.महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ७२२ वरून ९३४ रुपयांवर गेल्या असून तब्बल या अकरा महिन्यांत केवळ चार महिन्यांत किमती कमी झाल्या आहेत़ त्यात गेल्या आॅक्टोबरमध्ये ५७ रुपये आणि नोव्हेंबरमध्ये तब्बल ६२.५० रुपये अशी दोन महिन्यातच तब्बल ११९ रुपयांची वाढ झाल्याने गरीब कुटुंबाला त्याचा जास्त फटका बसला आहे़व्यावसायिक गॅस सिलिंडरचे (१९ किलो) दर नोव्हेंबर २०१७ मध्ये ११८९ रुपये होता. तो आता १६३३ रुपये झाला आहे़ गेल्या वर्षभरात ४४४ रुपयांनी महागला.त्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर ताण आला आहे़ हातगाडीवर वडापाव, डोसा व इतर खाद्यपदार्थ तयार करून विकणारे हजारो व्यावसायिक आता पूर्णपणे गॅस सिलिडर वापरू लागले आहेत़महागाई वाढत असताना गॅस सिलिंडरच्या किमती ज्या पद्धतीने वाढल्या, त्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला स्टॉल असलेल्या या छोट्या व्यावसायिकांना किमती वाढविता येत नाही़ त्यात आता त्यांच्यामध्येही स्पर्धा वाढल्याने दर वाढविण्यास मर्यादा आल्या आहेत़ त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायातील नफ्याचे प्रमाण कमी होण्यात झाला आहे़गॅस दरवाढ ही सातत्याने होत आहे. या दरवाढीमुळे आम्ही वडापावचे दर प्रत्येक महिन्यात बदलू शकत नाही. आता वडापाव बारा रुपयाला आहे तो पुढच्या महिन्यात चौदा रुपये झाला तर नागरिक खाणार नाहीत. आधी एक वडापावमागे दोन रुपये फायदा होत असे. पण या गॅस दरवाढीमुळे आता एका वडापावमागे एक ते दीड रुपया फायदा होत आहे.- दिलीप कदम, कर्जत वडापावगॅस दरवाढ होती. पण एवढा जास्त परिणाम होत नाही. आता एवढं - तेवढं होणारच की गॅस दरवाढ झाली तरी एवढा जास्त काय फरक पडत नाही. कारण आम्हाला आमच्या नफ्याचा अंदाज असतो. गॅस दर काय कमी-जास्त होतातच. एकेकाळी दर १८०० रुपये होते. म्हणून आम्ही किमतीचे व्यवस्थापन करतो.- इसाक शेख, पीडी पावभुर्जी सेंटरव्यावसायिकांना अधिक फटकादर महिन्यात गॅस दरवाढ होत आहे. परंतु, ते वाढलेले दर नागरिकांना कळत नाहीत व ते संभ्रमात राहतात. सिलिंडर ही दैनंदिन लागणारी वस्तू आहे. त्याच्या दरामध्ये कितीही चढउतार झाला तरी नागरिकांना सिलिंडर घ्यावेच लागते. सध्या एलपीजी सिलिंडरची किंमत ९३४ रुपये आहे. नोव्हेंबरमध्ये ती ९३२ वरून ९३४ वर गेली. या दोन रुपये दरवाढीचा नागरिकांना काही फरक पडत नाही. कारण जेवढा सिलिंडरचा दर वाढत जातो तेवढीच सबसिडी अधिक प्रमाणात मिळते. परंतु, आम्हाला फटका बसतो. या महिन्यात ९३४ च्या दरात नागरिकांना सबसिडी मिळणार आहे. परंतु कमर्शियल सिलिंडर दरवाढीचा व्यावसायिक हॉटेल, स्नॅक्स विक्रेते यांना फटका बसत आहे.- वैशाली देशमुख,जान्हवी गॅस एजन्सीव्यवसायासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचे दर आता १६०० रुपये झाले आहेत. गॅसचे दर वाढले परंतु आम्ही जे खाद्यपदार्थ विकतो. पोहे, खिचडी, समोसा यांचे दर स्थिरच ठेवावे लागतात. त्यामुळे नफ्यामध्ये घट होते.- अंजली दळवी, अस्मिता स्नॅक्स सेंटरआमच्या हॉटेलमध्ये व्हेज, नॉनव्हेज सर्व पदार्थ मिळतात. आम्हाला एक आठवड्यात चार, पाच सिलिंडर पुरेसे होतात. सध्या एका सिलिंडरची किंमत १६०० रुपये आहे. दर जरी वाढले तरी आम्ही व्हेज, नॉनव्हेज पदार्थांचे दर वाढवत नाही.- सनी नवगिरे, एस एस केटरर्स हॉटेल
सिलिंडरची वाढत जाणारी किंमतमहिना १४.२ किलो १९ किलो ४७ किलोजानेवारी ०७३२.०० १७९६.०० ३२२६.००फेब्रुवारी ०७२७ .०० १२९१.५० ३२२४.५०१२९४.०० ३२३२.००मार्च ०६८०.५० १२१५.५० ३०३५.५०एप्रिल ०६४४.५० ११६६.०० २९११.००मे ०६४२.५० ११५७.०० २८८९.५०जून ०६९१.०० १२३४.०० ३०८१.५०जुलै ०७४८.५० १३२४.५० ३३०७.००आॅगस्ट ०७८४.०० १३६७.५० ३४१५.००सप्टेंबर ०८१४.५० १४१५.०० ३५३३.००आॅक्टोबर ०८७१.५० १५००.५० ३७४८.००नोव्हेंबर ०९३४.०० १५९९.०० ३९८५.००