गावकारभा-यांचे आज मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:21 AM2017-12-26T01:21:44+5:302017-12-26T01:21:48+5:30
पुणे : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत.
पुणे : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. यावर्षी सरपंचांच्या निवडी थेट होणार असल्याने या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. आतापर्यंत ९९ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर तेरा सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.
जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींसाठी उद्या मंगळवारी ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचवण्यात आले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठे गुन्हे असणाºयांना याआधीच पोलिसांनी तडीपार केले आहे.
सरपंचनिवडीची प्रक्रिया थेट ग्रामस्थांमधून होणार असल्याने अनेकांचा कस लागणार आहे. निवडणुकीत मोठ्या ग्रामपंचायतीत मातब्बरांचा कस लागणार आहे.
> पुणे जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतीपैकी ८९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. दोन ग्रामपंचायती आणि तेरा सरपंचांची आधीच बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित ८९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
>आंबेगाव १०१ ०९
जुन्नर २३९ १७
खेड ३५ ०१
शिरूर २६ ०१
मावळ ८९ ०७
मुळशी ८३ १२
हवेली १८० ०९
वेल्हे १२ ०३
भोर २७ ०८
दौंड २३ ०१
बारामती २८६ १५
पुरंदर ३२ ०२