‘सोमेश्वर’च्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:26 AM2018-09-29T01:26:14+5:302018-09-29T01:26:24+5:30
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे यावरच तब्बल चार तास रंगली. सभासद साखर, बेसल डोस, शैक्षणिक संस्था, भाग विकास निधी या प्रमुख विषयावर चर्चा झाली.
सोमेश्वरनगर - सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे यावरच तब्बल चार तास रंगली. सभासद साखर, बेसल डोस, शैक्षणिक संस्था, भाग विकास निधी या प्रमुख विषयावर चर्चा झाली. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि शेतकरी संघटनेचे सतीश काकडे यांच्यातील वादविवाद वगळता सर्व विषयावर सविस्तर चर्चा पार पडली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी विविध विषयांवर खडाजंगी झाली.
कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २८) कारखाना कार्यस्थळावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. जगताप यांनी गेल्या हंगामातील कामकाजाचा आढावा घेतला. गेल्या हंगामात ९ लाख ८० हजार टनाचे गाळप करत सरासरी १२ चा उतारा ठेवत ११ लाख ७३ हजार साखर क्विंटलचे उत्पादन घेतले. चालू हंगामात ५० लाख टन साखरेला १३८ रुपये अनुदान देणार आहे. कारखान्यावर ४६ कोटींचे कर्ज असून त्याचे नियमित फेड सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सभेत भाऊसाहेब भोसले आणि चंद्रशेखर काकडे यांनी शिक्षण संस्थेचा दर्जा ढासळला आहे. प्राचार्य सोमनाथ हजारे यांनी ज्या शिक्षकाचा विषय बंद झाला आहे, त्याला हजारो रुपये
पगार कशासाठी असा सवाल विचारला. सभेत अनेक सभासदांनी सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या चुकीच्या कारभारावर ताशेरे ओढवले. प्रमोद काकडे
यांनी शिक्षण निधी कशासाठी
कपात करायचा असा सवाल उपस्थित केला. यावर अध्यक्ष जगताप
यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी हा निधी कपात करणार असल्याचे सांगितले.
ऊस बीलाचे दिलेले २०० रुपये अनुदानाप्रमाणे दिले आहेत. त्याचप्रमाणे सभासदांना अनुदान स्वरूपात साखर द्या. यासाठी न्यायालयात जावे लागणार नाही, अशी मागणी प्रमोद काकडे
यांनी केली. यावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी याबाबत ज्यांना २०० रुपयांबाबत न्यायालयात जायचे आहे, त्यांनी जावे असे सांगितले. गोरख खोमणे यांनी होळ, लाटे आणि
कोºहाळे या गावात निरा नदीचे येणारे काळे पाणी बंद करण्याची
मागणी केली. कांचन निगडे यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधीची तरतूद व्हावी अशी मागणी केली.
चंद्रशेखर काकडे, कांचन निगडे, जालिंदर जगताप, अॅड. बाळासाहेब गायकवाड, प्रा. बाळासाहेब जगताप, रामदास जगदाळे, भाऊसाहेब भोसले, विलास होळकर, दया चव्हाण, सतिश सावंत, अजय कदम, सुनिल भोसले, ज्योतीराम जाधव, सुनिल भोसले, रमाकांत गायकवाड, राजेंद्र जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.
...फुकट साखर देऊ
सतीश काकडे व प्रमोद काकडे सभासदांना दहा किलो साखर मिळावी हा मुद्दा लावून धरला. यावर अध्यक्ष सतीश काकडे यांच्यावर चांगलेच भडकले. तुम्ही साखर आयुक्तांची परवानगी आणा फुकट साखर देऊ. तुम्हीच चुकीची कामे करायला लावायची व तुम्हीच तक्रारी करायच्या, हायकोर्टात जायचं असा टोला लगावला. या मुद्यावरून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.