पुणे : खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्या करणार्या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याला ‘सज्जन’ चोर असे म्हणून ओळखले जाते.हर्षल राजाराम पिसाळ (वय ४३, रा. शिवतेज नगर, बकुळ हॉलजवळ) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसाळ हा सराईत वाहन चोरटा असून तो नातुबाग पेट्रोलपंपाजवळील दांडियाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक अनिकेत बाबर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला गजाआड करण्यात आले. तपासादरम्यान, त्याने दुचाकींच्या डिकी उचकटून त्यातील रोकड, मोबाईल आणि वाहने चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी, मोबाईल व २१ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्यावर २४ पेक्षा अधिक गुन्हे केल्याची माहिती दिली. त्याच्याविरुद्ध खडक, विश्रामबाग, सहकारनगर, बिबवेवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. तर शुभम शेंडकर (वय २३, रा. मंगळवार पेठ) हे शुक्रवार पेठेतील रेणुकामंदिरासमोर मोटारीच्या काचा उघड्या ठेवून झोपलेले असताना आरोपीने त्यांचा मोबाईल लंपास केला होता. त्याच्याविरुद्ध डेक्कनला दहा, स्वारगेटला पाच, सहकारनगरमध्ये तीन, येरवड्यात दोन, फरासखाना, विश्रामबाग, कोथरुडमध्ये प्रत्येकी एक असे एकूण २३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी डिकीमधील पर्स चोरल्यानंतर त्यातील फक्त रोकड काढून घेत होता. उर्वरीत कागदपत्रे अथवा माल फेकून देत होता. त्याला न्यायालयाने ३ आॅक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी विजय कांबळे, गणेश माळी, इम्रान नदाफ, अनिकेत बाबर, आशिष चव्हाण, राकेश क्षीरसागर, गणेश सातपुते यांनी केली.
खडक पोलिसांकडून ‘सज्जन’ चोरटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:59 PM
खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्या करणार्या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
ठळक मुद्देहर्षल राजाराम पिसाळ (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे.पिसाळ हा सराईत वाहन चोरटा असून तो नातुबाग पेट्रोलपंपाजवळील दांडियाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक अनिकेत बाबर यांना मिळाली होती.आरोपी डिकीमधील पर्स चोरल्यानंतर त्यातील फक्त रोकड काढून घेत होता. उर्वरीत कागदपत्रे अथवा माल फेकून देत होता.