ढोल-ताशांच्या दणदणाटात गणरायाला निरोप

By Admin | Published: September 25, 2015 12:55 AM2015-09-25T00:55:08+5:302015-09-25T00:55:08+5:30

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात व मंगलमय वातावरणात सात दिवसांच्या गणरायाला जुनी सांगवी व नवी सांगवीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत

Go to Ganaraya for a drumstick | ढोल-ताशांच्या दणदणाटात गणरायाला निरोप

ढोल-ताशांच्या दणदणाटात गणरायाला निरोप

googlenewsNext

पिंपळे गुरव : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात व मंगलमय वातावरणात सात दिवसांच्या गणरायाला जुनी सांगवी व नवी सांगवीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत जड अंत:करणाने बुधवारी निरोप देण्यात आला.
सांगवी व नवी सांगवी परिसरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांनी बुधवारी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती. परिसरात सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतोे. सकाळपासूनच गणेश विसर्जनाची तयारी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. परिसरातील मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि डीजेच्या तालावर काढलेल्या मिरवणुकीनंतर जुनी सांगवी येथील विसर्जन घाटावर गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले. या मिरवणुकीमध्ये लहान मुलांसह तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. विसर्जन मिरवणुकीमध्ये झांज पथकाच्या तालावर तरुणाईने ताल धरला होता.
मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने गणेशभक्त सहभागी झाले होते. जुनी सांगवी येथील बालाजी प्रतिष्ठानची मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. हर्षल ढोरे यांच्या कार्यकर्त्यांमुळे मिरवणुकीत शिस्तबद्धता होती. शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाचे ढोलपथकही लक्षवेधक होते. सिद्धिविनायक सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट अखिल शिवस्मृती मित्र मंडळाने सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढली. संस्थापक बजरंग ढोरे यांनी संयोजन केले. सांगवी गावठाणातील राही-माई प्रतिष्ठान व शिवमित्र मंडळाने सकाळी ११ वाजताच सूर्यरथातून मिरवणूक काढली. यामध्ये मोरया ढोल पथकाचा सहभाग होता.
सिझन गु्रप वेलफेअर ट्रस्टचा सांगवीचा राजा नावाने प्रचलित असलेली श्रींची आकर्षक, भव्य मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. मधुबन मित्र मंडळाने फुलांनी सजावट करून मिरवणूक काढली. गंगानगर येथील गणराज मित्र मंडळाने मिरवणूक न काढता, मंडळाचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला देण्यात आला. शितोळेनगर येथील जय माता दी, प्रियदर्शनीनगर, अखिल ममतानगर, पवनानगर, रणझुंजार, जयभवानी, शिवशक्ती आदी मंडळांनी आकर्षक मिरवणूक काढली.
नवी सांगवीतील जय मल्हार व शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या आकर्षक मिरवणुकीतील ढोल पथकाने मने जिंकली. समतानगर मित्र मंडळाने फुलांची केलेली सजावट विलोभनीय होती. रथावर जनजागृतीपर फलक लावले होते.
अखिल क्रांती चौक, नवी सांगवी विभागीय, श्री कृष्णाई मित्र, चैत्रबन, कीर्तिनगर, वागजाई, बारामती आदी मंडळांनी दिमाखात मिरवणूक काढली. महापालिकेच्या आरोग्य विभागच्या वतीने विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेरे, निर्माल्य कलश आदींची व्यवस्था क रण्यात आली होती.
पर्यावरण जागृतीविषयी फलकही लावण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप नौकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २००पेक्षा जास्त कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. ५ पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलीस निरीक्षक, ११५ पोलीस कर्मचारी, १७० पोलीस मित्रांचा बंदोबस्तामध्ये समावेश होता.
(वार्ताहर)

Web Title: Go to Ganaraya for a drumstick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.