पुणे : दुबईहून आलेल्या प्रवाशाने हेअर बँड, हेअर क्लिप आणि कीचैनमधून १७ लाख ५७ हजार रुपयांचे तस्करी करुन आणलेले सोने विमानतळ सीमा शुल्क विभागाने बुधवारी पकडले़.याप्रकरणी महंमद इरफान शेख (रा़ चिता कॅम्प, पथ सेंटरजवळ, ट्रॉम्बे,मुंबई) याच्यावर अवैधरित्या सोने आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ .दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़. विमानतळावर ते ग्रीन चॅनेलमधून कोणतेही सीमा शुल्क न भरता ते बॅग असलेल्या ठिकाणी जात होते़ .त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़. त्यात एका बॉक्समध्ये फॅन्सी हेअर बँड, हेअर क्लिप, कीचैनमध्ये २४ कॅसेट सोने दडविल्याचे आढळून आले़. ५६६़.७८ ग्रॅम वजनाचे १७ लाख ५७ हजार १८ रुपये सोने जप्त करण्यात आले आहे़.