मराठी शाळांना चांगले दिवस
By admin | Published: July 27, 2016 03:54 AM2016-07-27T03:54:47+5:302016-07-27T03:54:47+5:30
इंदापूर तालुक्यातील मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ४२९ विद्यार्थ्यांनी या वर्षी प्रवेश घेतलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील मराठी शाळेला
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील ४२९ विद्यार्थ्यांनी या वर्षी प्रवेश घेतलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील मराठी शाळेला पुन्हा चांगले दिवस येताना दिसत आहे.
इंदापूर तालुक्यात सध्या ३८५ मराठी शाळा चांगल्या स्थितीत सुरू आहेत. या शाळेत १९ हजार ६२२ पटसंख्या आहे. प्रत्येक शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिलीपासून इंग्रजी, ई-लर्निंग सुविधा, ए. बी. एन. ज्ञानरचनावाद, आकाशवाणी कार्यक्रम व पर्यावरणमुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेले असल्याने पालकांचा मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतून विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेपासून भरमसाट फीमोजावी लागते. फी आकाराच्या दराप्रमाणे योग्य शिक्षण मिळत नसल्याने व जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पालकांच्या मनातील मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. माझ्या मुलाला इंग्रजी लिहिता-वाचता येण्यासाठी धडपड सुरू होती. परंतु, सध्या सर्वच मराठी शाळेत पहिलीपासूनच इंग्रजी शिकवले जात असल्याने व सर्व विषयांचा अभ्यास करून घेतला जातो. पालकांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वाढत्या फी आकारणी यामुळे पालक वैतागून पुन्हा इंग्लिश मीडियम स्कूलमधील पाल्य मराठी माध्यमाच्या शाळेत मोठ्या प्रमाणात प्रवेश घेताना दिसत आहेत. (वार्ताहर)