पुणे : गेले काही दिवस सर्वांचे डोळे लागलेल्या हवामान खात्याचा यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर झाला असून जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून ९७ टक्के बरसणार आहे़. त्यात ५ टक्के वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे़. त्यात विशेष म्हणजे यंदा दुष्काळाशी सामना करावा लागणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़.पुणे येथील हवामान विभागाने विकसित केलेल्या मान्सून मॉडेलनुसार यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे़.हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा अंदाज सोमवारी दिल्लीतून जाहीर करण्यात आला़. स्कायमेंटने काही दिवसांपूर्वी यंदा मान्सून १०० टक्के बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता़. मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज दरवर्षी हवामान विभाग एप्रिल महिन्यात मध्याला जाहीर करते़.त्यानुसार सोमवारी हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे़. १९५१ ते २००० दरम्यानच्या व्यक्त करण्यात आलेला अंदाज व प्रत्यक्ष पडलेला पाऊस याचा अभ्यास करुन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़. उत्तर अटलांटिक आणि उत्तर प्रशांत महासागरातील तापमान, भूमध्य रेखीय दक्षिण हिंद महासागरातील तापमान, पूर्व अशिया, मध्य समुद्रातील हवेचा दाब, उत्तर पश्चिम युरोपातील हवामानाचे तापमान, भूमध्य रेखीय प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाहाचे तापमान या पाच घटकांचा अभ्यास करुन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ .पुण्यातील हवामान विभागात मान्सून मिशन अंतर्गत नवे मॉडेल विकसित करण्यात आले आहे़. त्यानुसार २०१७ पासून अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे़. यानुसार यंदा देशभरात दीर्घकालीन काळात ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात ५ टक्के वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे़.जून ते सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता ५ श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले आहे़. पाऊसचा अंदाज शक्यता टक्केवारी९० टक्क्यांपेक्षा कमी १४ टक्के९० ते ९६ टक्के ३० टक्के९६ ते १०४ ४२ टक्के१०४ ते ११० १२ टक्के११० टक्क्यांपेक्षा जास्त २ टक्केयानुसार मान्सून कालावधी पाऊस सामान्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असून कमी पावसाची शक्यता खूपच कमी असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़.मान्सून मिशन मॉडेल नुसार भूमध्यरेखीय प्रशांत महासागरात गेल्या वर्षी ला निनाची स्थिती सामान्य होती़. ती यावर्षाच्या सुरुवातीला कमजोर झाली आहे़. सध्या ला निना कमकुवत झाला आहे़.मान्सून मिशन मॉडेल आणि अन्य जागतिक मॉडेलनुसार ला निनाची स्थिती सध्या सामान्य आहे़.हिंदी महासागरातील स्थिती सध्या कमकुवत असून मान्सूनच्या मधल्या भागात ती आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता नाही़....* यंदा मान्सून ९७ टक्के बरसणार* ९६ ते १०४ टक्के पावसाची शक्यता* मे महिन्याच्या मध्याला मान्सूनचे केरळ मध्ये कधी आगमन होणार याचा अंदाज जाहीर होणार* जुलै व ऑगस्टचा अंदाज जून तसेच प्रत्येक हवामान विभागात कसा व किती पाऊस होणार याचा अंदाज जून महिन्यात जाहीर होणार
खुषखबर! यंदा मान्सून ९७ टक्के बरसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 8:52 PM
पुणे येथील हवामान विभागाने विकसित केलेल्या मान्सून मॉडेलनुसार यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे़.हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा अंदाज सोमवारी दिल्लीतून जाहीर करण्यात आला़.
ठळक मुद्देहवामान विभागाचा अंदाज : दुष्काळाची शक्यता नाहीपुण्यातील हवामान विभागात मान्सून मिशन अंतर्गत नवे मॉडेल विकसित