पुण्याच्या कचऱ्यात गफला? चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:53+5:302021-01-03T04:12:53+5:30
पुणे : पुण्यातील रामवाडी येथील सुमारे ४५ हजार टन कचºयावर प्रक्रिया करून, विल्हेवाट लावण्याचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्यासाठीचा प्रशासनाने ...
पुणे : पुण्यातील रामवाडी येथील सुमारे ४५ हजार टन कचºयावर प्रक्रिया करून, विल्हेवाट लावण्याचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्यासाठीचा प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावात अनेक मुद्दे आक्षेपार्ह आहेत. यामुळे सदर काम रद्द करून या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंच व नागरिक चेतना मंच यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे़
याबाबत दिलेल्या निवेदनात विवेक वेलणकर व विजय कुंभार यांनी, पुणे महापालिकेत ठराविक कालावधीनंतर असे प्रस्ताव येतात व ते सर्वानुमते मंजूरही होतात याकडे लक्ष वेधले आहे़ कचरा, पाणी अशा प्रश्नांवर तातडी निर्माण करायची आणि नंतर तातडीचा विषय म्हणून नियम व अटी डावलून ते मंजूर करायचे ही पुणे पालिकेतील जुनी प्रथा असून, पुण्याच्या कारभाºयांनाही असे विषय मंजूर करताना कोणतेचे प्रश्न पडत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे़
रामवाडी येथील कचरा प्रक्रिया कामास नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली़ या कामासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परंतु, सदर प्रस्तावात मांडलेले अनेक मुद्दे आक्षेपार्ह आहेत. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या ४४ लाख असून पुण्यात दिवसाला २००० ते २१०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो असे आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवलेल्या पत्रात म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी केलेल्या एका सादरीकरणात पुण्यात प्रतिव्यक्ती प्रतीदिन ३५० ते ७५० ग्रॅम कचरा जमा होतो असे म्हटले होते़
पण आता पुण्यात सरासरीपेक्षा प्रतिदिन प्रतीव्यक्ती १३७५ ग्रॅम जास्त कचरा निर्माण होतो असं प्रशासनाचं म्हणणे आहे. ही आकडेवारी खरी असेल तर प्रशासनाने त्याची कारणं आणि त्यावर उपाय काय आहेत हे सुचवणंगरजेचे होते पण तसे न करता ढोबळ आकडेवारी समोर ठेवून ठेकेदारांना काम देण्याचा डाव आखण्यात आला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे़
---------------------------------------