सरकार दरबारी अपंगांचे स्वावलंबन कार्ड ग्राह्य धरावे: धर्मेंद सातव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 09:51 PM2018-03-05T21:51:34+5:302018-03-05T21:51:34+5:30

पुणे : पेन्शन योजना, बस, एसटी, रेल्वे प्रवास सवलत, व्यवसायासाठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, घरकुल सवलत, अपंग-सपंग विवाह अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३ टक्के निधीमधून मिळणाया सवलती, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीसाठी स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) ग्राह्य धरण्यात यावे.

Government should accept self-compliance card for disabled persons: Dharmendra seventh | सरकार दरबारी अपंगांचे स्वावलंबन कार्ड ग्राह्य धरावे: धर्मेंद सातव 

सरकार दरबारी अपंगांचे स्वावलंबन कार्ड ग्राह्य धरावे: धर्मेंद सातव 

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रत्येक योजनेसाठी ही कागदपत्रे जमा करताना अपंगांना शारिरीक मर्यादामुळे खुपच अडीअडचणींना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) निर्मिती केली आहे.

पुणे : पेन्शन योजना, बस, एसटी, रेल्वे प्रवास सवलत, व्यवसायासाठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, घरकुल सवलत, अपंग-सपंग विवाह अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३ टक्के निधीमधून मिळणाया सवलती, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीसाठी स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी केली आहे. 
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगांना विविध प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतात. उदा. अपंग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनकार्ड, शाळेचा दाखला अशा अनेक प्रकारची कागदपत्रे जोडावी लागतात. प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतरच अपंगांना सवलती मिळतात. प्रत्येक योजनेसाठी ही कागदपत्रे जमा करताना अपंगांना शारिरीक मर्यादामुळे खुपच अडीअडचणींना सामोरे जावे लागते. आर्थिक फटका बसतो. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) निर्मिती केली आहे. हे कार्ड अपंग व्यक्तींना देताना केंद्र सरकारने सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच स्वावलंबन कार्ड दिले जाते. 
आजपर्यंत अनेकांना ही कार्ड वाटप करण्यात आली आहेत. मात्र योजनांचा लाभ घेताना ग्राह्य धरण्यात येत नाही. त्यामुळे यापुढे ही कार्ड ग्राह्य धरण्यात यावे,अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केली आहे.

Web Title: Government should accept self-compliance card for disabled persons: Dharmendra seventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.