पुणे : विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनातर्फे विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेत सुमारे ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमिताने एक प्रकारे भेटच मिळाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना नेहमीच खेळांसाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यापीठातर्फे २००७ पासून अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर आणि अश्वमेध स्पर्धेत पदक पटकावणाºया विद्यार्थ्याला शिष्यवृती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी या शिष्यवृत्तीचा दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. शिष्यवृत्तीच्या रकमेतून विद्यार्थ्यांना खेळासाठी असणारे आवश्यक साहित्य व प्रशिक्षण घेता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळात सुधारणा होते. विद्यापीठाकडून दिली जाणारी रक्कम वाढवली कमी असल्याने त्यात वाढ करावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे अखिल भारतीय आंतरविद्यापीठस्तरीय वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाºया विद्यार्थ्यांला पूर्वी १० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यात १५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच द्वितीय क्रमांक मिळवणाºया विद्यार्थ्याला आता ७ हजारांऐवजी १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ५ हजारांऐवजी ७ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सांघिक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ७ ऐवजी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ ऐवजी ७ आणि तृतीय क्रमांकासाठी ३ ऐवजी आता ५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
अखिल भारतीय शिष्यवृत्ती स्पर्धेबरोबरच अश्वमेध स्पर्धेत यश मिळवणाºया खेळाडूंच्या शिष्यवृत्तीतही वाढ करण्यात आली आहे. वैयक्तिक स्पर्धेत प्रथक क्रमांक पटकावणाºया विद्यार्थ्याला ५ ऐवजी ७ हजार द्वितीय क्रमांकासाठी ३ ऐवजी ५ हजार आणि तृतीय क्रमांक मिळवणाºया विद्यार्थ्याला २ ऐवजी ३ हजार रुपये देण्यात येणार आहे. सांघिक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंना ३ ऐवजी ५, द्वितीय क्रमांकासाठी २ ऐवजी ३ आणि १ ऐवजी २ हजार दिले जाणार आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाºया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिष्यवृत्तीवाढीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीचे इतिवृत्त अद्याप तयार झालेले नाही. मात्र, लवकरच शिष्यवृत्तीवाढीची अधिकृत घोषणा केली जाईल.- एन. एस. उमराणी,प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ