बारामती : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. गावच्या शिखर संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया बारामती तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.तालुक्यातील या गावांत रणधुमाळी उडाली आहे. यंदाच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावासह भाजपचे नेते बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावाचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.गावात पत असेल तरच नेतेमंडळींना बाहेर किंमत असते. त्यामुळे जिल्हा, राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाºया बड्या राजकीय नेत्यांनादेखील गावातील पत टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आणि गावच्या शिखर संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवारी निश्चित करताना गावपुढाºयांची कसोटी लागत आहे. राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणाºया नेत्याच्या गावची ही निवडणूक आहे. त्यामुळे या मोठ्या गावांमध्ये टोकाची ईर्षा होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय पातळीवरची नसली तरी तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात काही ठिकाणी भाजपा सेना असे लढतीचे संकेत मिळत आहेत. पण इतर गावांत स्थानिक पातळीवरच राजकारण जोरात असल्याने येथे स्थानिक गटांत मोठा संघर्ष अटळ आहे.यंदा सरपंचपद हे थेट जनतेतून होणार असल्यामुळे यंदाची निवडणूूक वेगळी ठरणार आहे. याबाबत सोशल मीडियावरून निवडणुकीत आताच रंग भरू लागले आहेत.निवडणुकीच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. गावचीच निवडणूक असल्याने राष्ट्रवादीच्या आणि भाजपाच्या नेत्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होऊ लागेल.
बड्यांच्या गावांत ग्रामपंचायत लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 6:41 AM