पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:27 PM2021-07-14T19:27:08+5:302021-07-14T19:29:12+5:30

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रघुनाथ राजाराम येमूल यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

Granted bail to adhyatmik guru Raghunath Yemul of Pune | पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

googlenewsNext

पुणे : बायकोचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही, असा सल्ला देऊन प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छ्ळ करायला प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरलेला कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दोन दिवस पोलीस कोठडीनंतर मंगळवारी ( दि.13) त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी येमूल याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रघुनाथ राजाराम येमूल (४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ४९८(अ), ३९२, ३५४, ३२६(अ), ३२३, ३२५, ४०६, ४२०,१२०(ब),५०६सह ३४ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल आहे. त्याच्या पोलिस कोठडीची एक दिवसाची मुदत मंगळवारी (दि.१३ ) संपली.

आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि कीर्ती गुजर यांनी चेन्नईच्या एका तांत्रिकाशी रघुनाथ येमूलने गणेश गायकवाड याची ओळख करून दिली होती. येमूल हा हस्तरेषातज्ञ आहे. त्याची प्रमाणपत्र जमा करायची आहेत. त्याच्याबाबत आणखी कुणाची तक्रार असेल तर समोर येण्याचे आम्ही आवाहन केले आहे. त्याचा तपास करायचा आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवस वाढ करण्याची मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांना केली. मात्र, चोवीस तासात एकही तक्रारदार समोर आलेला नाही. कुणी तक्रारदार पुढे आल्यास येमूल याला पुन्हा पोलीस कोठडी देता येऊ शकते असा युक्तीवाद आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि कीर्ती गुजर यांनी केला. तो मान्य करीत न्यायालयाने येमूलला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी मे. एस. व्ही. निमसे कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

आरोपीविरुद्ध फिर्यादीमध्ये कोठेच उल्लेख नसून, कलम ३२६(अ) बद्दल पुरवणी जबाबामध्येही फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध उल्लेख केला नसून आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.कोर्टाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.
  -------------------------------------------------------------------

Web Title: Granted bail to adhyatmik guru Raghunath Yemul of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.