पुणे : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत १ जानेवारी रोजी पुणे महापालिका प्रांगणात महापालिकेच्यावतीने आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत हरित शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला़
निसर्गाशी संबंधित पंच तत्वांवर ‘माझी वसुंधरा’ अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी व प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करून सभोवतालच्या पर्यावरणाला हरित करणे, पर्यावरणाला सोबत घेऊन विकास करावा असे यावेळी कुमार यांनी सांगितले़
नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी अधिकारी व कर्मचारी यांना हरित शपथ दिली़अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, उपायुक्त सुनील इंदलकर, सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे उपस्थित होते़
‘माझी वसुंधरा’ अभियान १ ते १५ जानेवारी या कालावधीत आयोजित केले असून, प्रत्येक नागरिकाने, शाळा, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये यांनी कोरोनासंबंधित सूचनांचे पालन करून, पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने छोटया ग्रुपने अथवा ऑनलाईन हरित शपथ घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे़
--
फोटो मेल केला आहे़