राजगुरूनगर एसटी बसस्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. आमदार मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, अरुण चांभारे, हिरामण सातकर, विजया शिंदे, विजय डोळस, कैलास सांडभोर, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, अशोक दुगड, सुदाम कराळे, मधुकर गिलबिले, बापू घाटकर, सुनील वाळुंज, मनीषा पवळे, किसन लोणकर, सुशील शिंगवी, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, मारुती सातकर आदी मान्यवर व नागरिकांनी अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला. हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, सचिव मुकुंद आवटे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्यावर माजी सैनिक गुंड हरी गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, किरण मांजरे, अजित वाळुंज, नगरसेविका रेखाताई श्रोत्रीय, संपदा सांडभोर आदी या वेळी उपस्थित होते. सुशील मांजरे, विठ्ठल पाचारणे, नितीन शहा, संजय नाईकरे, शैलेश रावळ, नरेंद्र गायकवाड यांनी संयोजन केले. स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:13 AM