पुणे : तरुणाईसाठी हाॅट डेस्टिनेशन म्हणून खडकवासला धरण अाेळखले जाते. अाठवड्याचे सर्वच दिवस या ठिकाणी तरुणाईची गर्दी असते. प्रशासनाकडून पाण्यात उतरु नका म्हणून वारंवार अावाहन करण्यात येते. परंतु प्रशासनाचे एेकेल ती तरुणाई कसली. अाज (रविवार) काही तरुणांच्या गटाने तर थेट धरणातच अापल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला.
शनिवार, रविवार खडकवासला धरण चाैपाटी, सिंहगड, खडकवासला बॅक वाॅटर या ठिकाणी तरुणांची गर्दी असते. त्यांच्याकडून धरण चाैपाटीच्या दुतर्फा वाहने लावण्यात येत असल्याने माेठी वाहतूक काेंडी या भागात हाेत असते. यावर उपाय म्हणून शनिवार-रविवार चाैपाटीवर गाड्या लावण्यास तसेच खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई करण्यात अाली हाेती. परंतु प्रशासनाचे सर्व अादेश धुडकावत रविवारी सुद्धा या ठिकाणी गाड्या लावून नागरिक धरणात उतरत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर खाद्यपदार्थांच्या गाड्याही राजराेसपणे सुरु अाहेत.
त्यातच रविवारी तरुणांच्या एका गटाने तर कहरच केला. तरुणांनी अापल्या मित्राचा वाढदिवस थेट धरणात उतरुन साजरा केला. धरणातील पाण्याची पातळी सांगणाऱ्या दगडावर केक ठेवून या तरुणांनी पाण्यात उतरुन केक कापला. त्याचबराेबर भरमसाठ सेल्फी घेऊन ते साेशल मिडीयावर टाकत अाम्ही कसा खास वाढदिवस साजरा केला हे त्यांनी त्यांच्या मित्रांना दाखवले. इतकेच नाहीतर केक कापून झाल्यानंतर एकमेकांना पाण्यात ढकलून अघाेरी अानंदही सगळ्यांनी घेतला. त्यांना काेणाच्याच जिवाची पर्वा नसल्याचे दिसून अाले. यांच्यासारखेच अनेक उत्साही तरुण धरणात उड्या मारुन यथेच्छ पाेहण्याचा अानंद लुटत हाेते.
खडकवासला धरणातील पाणी पुण्याला पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने तसेच धरणाच्या खाेलीचा अंदाज येत नसल्याने धरणात उतरण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात अाला अाहे. परंतु या अादेशाला नागरिकांकडून खासकरुन तरुणाईकडून केराची टाेपली दाखवण्यात येत अाहे. त्यामुळे प्रशासन याला पायबंद घालण्यासाठी पाऊले उचलणार का असा प्रश्न विचारला जात अाहे.