शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:56 AM2017-11-09T11:56:39+5:302017-11-09T11:57:53+5:30

केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावत आहे.

GST on Classical Music Programs | शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी

Next

पुणे - केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावत आहे. त्याचा संगीताच्या प्रचार आणि प्रसारावर नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवावा, अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली आहे. जीएसटी कायम राहिल्यास यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटांच्या दरांमध्ये वाढ होईल, असेही ते म्हणाले.

याबद्दलचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनाही याबद्दल निवेदन देण्यात आले आहे. याप्रश्नी स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या मागणीला डॉ प्रभा अत्रे, पं. शिवकुमार शर्मा, गुंदेजा बंधू, पं. राजन आणि साजन मिश्रा, निलाद्री कुमार, पं. उल्हास कशाळकर, एल. सुब्रमण्यम आदी कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्र सरकारने लक्झयुरियस सेगमेंटमध्ये शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा समावेश करत २५० रुपयांपेक्षा जास्त तिकिटांवर २८ टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे श्रोत्यांना वाढीव तिकिटांचा भार सहन करावा लागत आहे. तिकिटांच्या वाढीव किमतीमुळे श्रोत्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होईल. तिकिटांचे दर कमी केल्यास आजच्या काळात कार्यक्रमच्या खर्चाचा ताळेबंद बांधणे आयोजकांना शक्य होणार नाही. अशा पद्धतीने आयोजक, कलाकार आणि प्रेक्षक दुहेरी कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे जीएसटी हटवावा, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
 

Web Title: GST on Classical Music Programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.