दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:13+5:302021-01-13T04:22:13+5:30
धायरी : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. ...
धायरी : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. या दुर्घटनेने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशही हादरला. धायरी येथील दयासम्राट फाउंडेशनच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप, निरागस बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी दया सम्राट फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा विद्या हांडे-देशमुख म्हणाल्या की, भंडारा येथील शिशु केअर अग्निखंडात मृत्युमुखी पडलेल्या शिशुच्या पालकांना सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. परंतु, सरकारने फक्त मदत करून न थांबता चौकशी करून याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
दयासम्राट फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांच्या हातुन मेणबत्या प्रज्वलित करून यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दयासम्राट फाउंडेशनच्या उपाध्यक्षा प्रेरणा सोनकवडे यावेळी उपस्थित होत्या.
फोटो ओळ :
भंडारा येथील शिशु केअर अग्निखंडात मृत्युमुखी पडलेल्या शिशूना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.