अजित पवारांच्या विरोधात माळेगावचे गुरु-शिष्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:16 PM2019-08-27T12:16:12+5:302019-08-27T12:35:57+5:30

अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यासाठी तब्बल नऊजण इच्छुक आहेत...

Guru and shishya of Malegaon against Ajit Pawar? | अजित पवारांच्या विरोधात माळेगावचे गुरु-शिष्य?

अजित पवारांच्या विरोधात माळेगावचे गुरु-शिष्य?

Next
ठळक मुद्दे विधानसभा लढविण्यासाठी नऊजण इच्छुकसासवड येथे पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड व भोर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार बारामतीच्या जागेसाठी शिवसेनेची फिल्डिंग 

प्रशांत ननवरे - 
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बड्या नेत्यांचे भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढल्यानंतर बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यासाठी तब्बल नऊजण इच्छुक आहेत. यापैकी काहींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या गुरु- शिष्यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यासह माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवार निश्चितीसाठी भाजप मंगळवारी (दि.२७) सासवड येथे पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड व भोर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भामे यांनी दिली. बारामतीत पवार यांच्या विरोधातील इच्छुकांची चर्चा रंगली आहे.
भाजपमधून चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, ज्ञानेश्वर कौले, प्रशांत सातव, कुलभुषण कोकरे, राहुल तावरे आदींची नावे चर्चेत आहेत. एकेकाळी पवार यांचेच त्या काळातील निकटवर्तीय चंद्रराव तावरे यांनी १९९९ साली अजित पवार यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत ३६ हजार १४१ मते मिळवली. तर पवार यांंना त्या निवडणुकीत ८६ हजार ५०७ मते मिळाली होती. २००९ मध्ये पवार यांच्या विरोधात रंजनकुमार तावरे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. तावरे यांच्या रुपाने भाजपने प्रथमच या मतदारसंघात निवडणूक लढविली. यामध्ये पवार यांना १ लाख २८ हजार ५४४ मते मिळाली होती. तसेच २०१४ मध्ये पवार यांच्या विरोधात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी बाळासाहेब गावडे यांनी निवडणूक लढविली आहे. यामध्ये पवार यांना १ लाख ५० हजार ५८८ मते, तर गावडे यांना ६० हजार ७९७ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे तावरे गुरु शिष्य किंवा गावडेंना पुन्हा उमेदवारी मिळणार की भाजप नवीन चेहºयाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन चेहºयांमध्ये खैरे, सातव, मोटे हे प्रबळ दावेदार मानले जातात. खैरे यांनी आपण मुलाखत देणार नाही. मात्र, पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढविणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, सासवड येथे भारतीय जनता पक्ष पुणे यांच्या वतीने पुणे ग्रामीण भागातील असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याकरिता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निरीक्षक म्हणून रायगड चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार या वेळी चव्हाण पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. 
..........
बारामतीत विधानसभा उमेदवारीसाठी ‘त्रिकोण’
भाजप शिवसेनेसह महायुतीच्या घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील बारामतीच्या 
जागेची मागणी के ल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीत सध्या विधानसभा उमेदवारीसाठी ‘त्रिकोण’ निर्माण झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारखा प्रबळ उमेदवार असूनदेखील तिन्ही पक्षांनी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे.
 लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांकडे जागावाटपबाबत दुर्लक्ष करणाऱ्या  महायुतीने विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात कोण लढणार, याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
.......
बारामती विधानसभा निवडणुकीसाठी २०१४ मध्ये भाजप शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढविण्यात आली होती. यंदा २०१९च्या विधानसभा निवडणुकीबाबत घटकपक्षांसह निवडणूक लढविण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. मात्र, यंदादेखील भाजपसह शिवसेनेच्या वतीने बारामती विधानसभा उमेदवारीसाठी मागणी करण्यात आली आहे. 

हा मतदारसंघ वर्षानुवर्षे शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. १९९२ पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे यंदादेखील शिवसेना विधानसभा निवडणूक लढविणार आहे. याबाबत मागील आठवड्यात ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघाचा आग्रह न धरता मित्रपक्षाचा धर्म पाळावा, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
.....


 

Web Title: Guru and shishya of Malegaon against Ajit Pawar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.